Ticker

6/recent/ticker-posts

घाटापिंपरी येथे आजपासून संगीत भागवत कथा व हरिनाम सप्ताह सुरू



 

आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे गुरुवर्य संत मदन महाराज बिहाणी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांच्या प्रेरणेतून सप्ताहात आळंदीचे कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य संतोष महाराज मोरे यांची कथा होणार आहे.त्यांना साथसंगत सिंथेसायझर वादक कृष्णा महाराज भांड,गायक संपत महाराज दानवे,तबला वादक रविंद्र महाराज (तबला अलंकार) मृदुंगाचार्य अनिकेत महाराज चांगुणे यांची लाभणार आहे.दररोज दुपारी २ ते ५ या वेळात कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य संतोष महाराज मोरे (आळंदी) यांची संत संगीत भागवत कथा होणार आहे.या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्त्रनाम,गीतापाठ,पसायदान,ज्ञानेश्वरी पारायण,

गाथाभजन, संगीत भागवत कथा,हरिपाठ,हरिकीर्तन,जागर (संगीत भजन) आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी (श्री.क्षेत्र धामणगांव),ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले (श्री क्षेत्र परभणी),युवा किर्तनकार अक्षय महाराज उगले(श्री क्षेत्र जेऊर हैबती), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बावस्कर (श्री क्षेत्र जळगांवजामोद),

ह.भ.प.भागवताचार्य दत्तात्रय महाराज हुके (श्री क्षेत्र परांडा)

 झी टॉकीज प्रसिध्द राष्ट्रीय शिवचरित्रकार ह.भ.प.

प्रा.डॉ.गजानन महाराज वाव्हळ,(पुणे), बुधवार दि.२४ मे रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांचे सकाळी ११ ते १ या वेळात तर ह.भ.प.रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे (श्री क्षेत्र आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे.दि.२५ मे रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,अभंगगाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत मदन महाराज यांच्या प्रतिमेची आणि ह.भ‌.प‌.बबन महाराज बहिरवाल महाराज यांची टाळ-मृदंग,ढोल-लेझीम व हलगीपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे.गुरुवार दि. २५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संत मदन महाराज संस्थान कडा व गुरुकुल आश्रम धामणगांवचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे सुश्राव्य हरिकिर्तन होईल.

त्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल.ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तनास आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार,डॉ.

शिवाजी राऊत,सतिषआबा शिंदे,आण्णासाहेब चौधरी,

हनुमंत थोरवे,जि.प.सदस्य,

सभापती,उपसभापती,पं.स.

सदस्य,पत्रकार ,विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या