Ticker

6/recent/ticker-posts

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आयोजित दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.....




सामाजिक न्याय विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजयदादा धोंडे यांनी केले.

आष्टी तालुक्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे मंगळवार दि.३० मे रोजी मोफत दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे पात्र लाभार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ.अजयदादा धोंडे यांनी केले आहे.प्रसिद्धी पत्रकात डॉ.अजयदादा धोंडे यांनी म्हटले आहे की, खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांगासाठी सेवा यज्ञांचे आयोजन केले आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व दिव्यांग जन सशक्तिकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने व केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोफत दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार दि ३० मे रोजी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात या शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिर उद्घाटनासाठी जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे माजी आ.भीमराव धोंडे आ.सुरेश धस ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव मस्के त्याचप्रमाणे तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.आष्टी तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी या शिबिरात सहभागी होऊन दिव्यांगाची सहाय्यक साधने मोफत घ्यावीत असे आवाहन करून डॉ.अजयदादा धोंडे यांनी दिव्यांग बांधवांना नोंदणीसाठी खालील कागदपत्रे सोबत घेऊन येण्याचे ही विनंती केली आहे.


*नोंदणीसाठी आणायची कागदपत्रे*

------------------------

दिव्यांग बांधवांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी  आधार कार्ड, चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र,बीपीएल राशन कार्ड किंवा उत्पनाचे प्रमाणपत्र ( प्रतिमहिना २२ हजार पेक्षा कमी) सदरील कागदपत्रे ही झेरॉक्स स्वरूपात आणायची असून तपासणी शिबिरात नोंदणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या साधनांचे होणार वाटप

व्हील चेअर,ट्रायसिकल, श्रवणयंत्र,कृत्रिम अवयव, स्टिक,  एक्सिला क्लचस, एलबो क्लचस, एडीएल किट, सिपी चेअर, स्मार्ट कॅन,स्मार्ट फोन, ब्रॅडल कॅन,बेली किट या सहाय्यक साधनांचे होणार असून दिव्यांग तपासणी शिबिरात केवळ नोंदणी आणि तपासणी करण्यात येणार आहे. तदनंतर संबंधित विभागाने आवश्यक साधने आणि उपकरणांची पूर्तता केल्यानंतर सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या