उत्तम बोडखे
आपल्या कलाकौशल्यातून विद्यार्थीदशतच अनेकांची मने जिंकत विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमात रांगोळीतून उत्कृष्ट निर्मिती करून शाब्बासकी मिळवणाऱ्या सख्या बहिनी आष्टीकरांसाठी अभिमानास्पद ठरल्या आहेत.आरती नवनाथ ससाणे आणि श्रद्धा नवनाथ ससाणे या दोन सख्ख्या बहिणी शाळा महाविद्यालयामध्ये आष्टी येथे शिक्षण घेतात.पिता तथा वडील नवनाथ ससाणे यांना या दोन्ही मुली असल्याची कधीही खंत वाटली नाही.ऊलट बहिण नसल्याने तुळजापूरच्या जगदंबेकडे नवस बोलुन मुलीची मागणी करणारे नवनाथ ससाणे आहेत.त्यांनी या दोन्ही मुलींचे अतोनात लाड केले आणि शिकवण्याची जिद्द ही धरली.नवनाथ ससाणे हे औषधी दुकानात कामाला असून आपल्या मुलींनी मोठे चित्रकार ,कलावंत व्हावे या स्वप्नात आहेत.आरती आणि श्रद्धा या अत्यंत हुशार सालस आणि जिद्दी मुली आहेत.आरती ही हंबर्डे महाविद्यालय बी.ए.च्या अंतिम वर्गात शिकत आहे तर श्रद्धा नववीत आष्टी येथील कन्या शाळेत अध्ययन करते आहे.शालेय शिक्षण करत असतानाच त्यांना रांगोळीतून उत्कृष्ट चित्र निर्मितीचा छंद लागला.दोन्हीही भगिनींनी कुठलाही गुरु नसताना केवळ विविध ठिकाणी पाहून आणि मोबाईलवरुन या कलेचे ज्ञान आत्मसात केले आहे. आतापर्यंत असंख्य हुबेहूब चित्र रांगोळीतून रेखाटले. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, दिवंगत इंदिरा गांधी,म.फुले, स्वा.सावरकर,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,गानकोकीळा लता मंगेशकर,पंतप्रधान नरेंद्र मोदी,शरद पवार,अजितदादा पवार,देवेंद्र फडणवीस आदीसह महान राष्ट्रपुरुषांचे रांगोळीतून चित्र साकारून अनेकांची शाब्बासकी मिळवली आहे.नुकतीच क्रांतीसुर्य म.गांधी जयंतीनिमित्त म.फुले यांची १०० किलो रांगोळीतुन ८ फुट बाय ८ फुट आकाराची भव्य प्रतिमा साकारली.या उत्कृष्ट कलेबद्दल आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,सतीशआबा शिंदे,साहेबराव म्हस्के, जयदत्त धस,अजयदादा धोंडे,म.फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे, नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.कला कौशल्याच्या त्यांच्या कलेमुळे अनेक शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांकडून या दोन्ही भगिनींचा यशोचित सन्मान झाला आहे,आणि होत आहे. आम्हा आष्टीकरांना ही भूषणावह बाब असल्याचे आरती व श्रध्दाचे वडील नवनाथ ससाणे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या