Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी अमिया येथे ३४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे अजय धोंडे यांच्या हस्ते झाले उदघाटन

 


आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन आयोजित केले होते. टाकळी अमिया येथे माजी आ.भीमराव धोंडे यांचे चिरंजीव युवानेते डॉ.अजय धोंडे यांच्या शुभ हस्ते ३४ लक्ष रुपये खर्चून विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले.यावेळी सरपंच सावता ससाणे, शिवाजी पाटील चौधरी, अशोक एकशिंगे,उपसरपंच नारायण चौधरी,गहीनाथ खोटे, भानुदास शेंडगे,महादेव भुकन, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर भूकन, सतीश सातपुते, अशोक खोटे, विष्णू निंबाळकर  रवींद्र भूकन ,शहादेव भूकन, विष्णू भुकन ,बापू ससाने, ज्ञानेश्वर भुकन ,नारायण खोटे, माऊली खोटे, कल्याण खोटे, बाबासाहेब भुकन ,संजय ससाने, दत्तू भुकन, नवनाथ ससाने, संतोष भुकन, अंगद भुकन,उत्तम भुकन, बबन शेंडगे ,गणेश भुकन,मल्हारी खोटे,दत्तू खोटे,राजेंद्र खोटे, योगेश कर्डिले, नरोटे दाजी, संपत पांढरे ,संपत भुकन, सत्यवान ससाने,अमोल भुकन ,बी.जे .ससाणे ,ज्ञानेश्वर खोटे ,किरण खोटे ,शिवाजी खोटे ,राजेंद्र कर्डिले ,प्रदीप ससाने, संभाजी ठोंबरे ,शिवाजी भुकन, सुदाम शिंदे,ग्रामसेवक राठोड,भुकन महादेव,विठ्ठल भुकन ,काकासाहेब खोटे, बालू खोटे, महिला, पंचक्रोशीतील व टाकळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया हे आदर्शगाव करण्यासाठी गेली सात वर्षापासून साईनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष सावता ससाणे व मित्रपरिवार परिश्रम घेत आहेत.गेली सात वर्षांपासून सावता ससाणे हे कोणत्याही जाती धर्मातील मुलींचे लग्न होत असताना गॅस आणि संसार उपयोगी वस्तू सुमारे ११ हजार रुपये किंमतीचे सप्रेम भेट देत आहेत.या त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.आज सोमवार दि.८ मे रोजी खोटेवस्ती सिमेंट काँक्रीट रस्ता २० लाख रुपये,मारुती मंदिर समोर पेंविंग ब्लॉक २ लक्ष रुपये खर्चून टाकले जाणार आहे. अंगणवाडी खोलीचे बांधकाम १२ लक्ष रुपये खर्चून होणार आहे. या सुमारे ३४ लक्ष रुपये खर्चून होणाऱ्या विविध विकासकामांचे युवा नेते अजय धोंडे  यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या