आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील सरपंच सावता ससाणे यांच्याविरोधात खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.हा खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी टाकळी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.      
       दि. १७ मे रोजी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,अजित शेंडगे यांनी फळबागाचे नुकसान केले अशी तक्रार देऊन सावता ससाणे,अशोक एकशिंगे,अमोल भुकन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुठलेही चौकशी अथवा पंचनामा न करता हा  गुन्हा दाखल करून घेतला आहे.वास्तविक पाहता फळबागाची कुठलीही नुकसान झालेली नाही तरीही गुन्हा दाखल केल्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी टाकळी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवाजी पाटील चौधरी,इंजि. बाळासाहेब भुकन,काकासाहेब चौधरी माजी सरपंच, डॉ.दत्तात्रय जाधव,नारायण चौधरी, उपसरपंच गहिनीनाथमामा खोटे, महादेव चौधरी, बाबासाहेब भुकन, बापू ससाणे, महादेव पांढरे, ग्रामपंचायत सदस्य कचरू तात्या भुकन, ग्रामपंचायत सदस्य सतीश सातपुते, ग्रा.पं. सदस्य अशोक खोटे,शहादेव भुकन,माऊली खोटे,अर्जुन भुकन,जालिंदरदादा खोटे,युवराज ससाणे, दत्तू खोटे, ज्ञानेश्वर खोटे, सतीश ससाणे, कल्याणराव खोटे,अशोक एकशिंगे, अमोल भुकन, राजेंद्र खोटे,महादेव भुकन, सुभाष भुकन, संपत भुकन,नारायण ससाणे, योगेश कर्डिले,नारायण खोटे,गोरख चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.