Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्याचे आडवलेले काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी हातोला ग्रामस्थांचे उपोषण सुरू

 नगर-बीड महामार्ग ते नाकाडे, ढाकणे, खामकर, गोल्हार,केदार,
चौधार, कुटे, गर्जे, कुत्तरवाडे,राख, कदमवस्ती (हातोला) या रस्त्याचे 
काम सुरू आहे.या वस्तीची लोकसंख्या दिड हजार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्याठिकाणी बीड महामार्ग ते 
नाकाडेवस्ती हातोला असे रस्त्याचे काम सुरू होते. सदरील 
रस्ता हा डोंगरालगत शासकीय गायरान जमीनीतून जाते आहे.
गायरान जमीनीलगत असलेल्या जमीन सर्व्हे नंबर ,८३ जूना 
सव्हें नंबर १४८ मधील काही खातेदारांनी विनाकारण 
जाणीवपूर्वक या रस्त्याचे कामकाज बंद पाडले आहे.वास्तविक
 सदरचा रस्ता गायरान जमीनीतून पुर्वपार असा चालत 
आलेला आहे.या रस्त्याशी आणि सर्वै नंबर ८३ जूना 
सर्व्हे नंबर १४८ मधील खातेदारांच्या जमीनीशी काहीएक 
संबंध नव्हता व नाही असे असतांना केवळ वस्तीवरील 
लोकांना त्रास देण्याच्या कुटील हेतूने सदर लोकांनी रस्त्याचे 
काम बंद पाडले आहे.हातोला येथील नाकाडेवस्तीवरील लोकांना
 या नगर - बीड महामार्गाकडे जाणे येण्यासाठी दुसरा अन्य 
पर्यायी रस्ता उपलब्ध नव्हता आणि नाही. याच रस्त्याने पुर्वपार 
वस्तीवरील लोकांचे जाणे येणे राहिलेले आहे. तथापी हा रस्ता 
अत्यंत खराब झाल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे 
काम सुरू झाले होते. परंतु काही लोकांनी सदर रस्त्याचे 
कामकाज आडवल्यामुळे रस्त्याचे काम बंद पडले आहे व त्यामुळे
 सदरचा रस्ता पुर्णतः बंद पडलेला असल्याने सदर रस्त्याने 
कोणासही जाता येता येत नाही. सदर वस्तीवर जिल्हा परिषद 
प्राथमिक शाळा आहे.या शाळेवरील शिक्षकांना जाणे येण्यासाठी
 रस्ता नसल्याने शाळा बंद पडेल व वस्तीवरील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे 
नुकसान होऊन त्यांचे भविष्य अंधकारमय होईल.वस्तीवरील आजारी
 व्यक्ती, वयोवृध्द व्यक्ती यांना दवाखान्यात घेऊन जाणेदेखील शक्य 
राहिले नसल्याने त्यांचे जिवीतास धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे 
नजीकच्या काळात वस्तीवरील लोकांना त्यांचे शेतीमध्ये पेरणीसाठी 
साठी खते, बी बियाणे इत्यांदीची ने आण करता येत नाही त्यामुळे 
देखील शेती पडीक राहुन वस्तीवरील लोकांचे कधीही न भरून 
येणारे असे नुकसान होईल व होत राहील.आष्टी तालुक्याच्या 
गावाला अगर जिल्हयातील शासकिय कामासाठी लोकांना 
जाणे येणेसाठी रस्ता नसल्याने त्यांची शासकिय कामेदेखील 
खोळंबलेली आहेत.त्यामुळे या सर्व बाबींचा सहानभुतीपुर्वक 
विचार होऊन हातोला  या ठिकाणी नगर - बीड महामार्ग ते 
नाकाडेवस्ती या रस्त्याचे कामकाज पुर्ववत चालु करण्यात 
येऊन सदरचा वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्यात यावा. 
या वस्तीवरील सरपंच बाबासाहेब गर्जे यांच्या सह आदिनाथ गर्जे, 
हरिभाऊ ढाकणे, सुभाष ढाकणे,बाळासाहेब ढाकणे, 
प्रल्हाद ढाकणे, परसराम खामकर, गहिनीनाथ चौधार ,
गोरक्ष चौधार, गोवर्धन नाकाडे, नवनाथ चौधार यांच्यासह नाकाडे,
 ढाकणे,खामकर, गोल्हार,केदार,चौधार,कुटे,गर्जे,कुत्तरवाडे,राख,
कदमवस्ती (हातोला)  आदि ग्रामस्थ आष्टी तहसिल 
कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या