Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी बस स्टँन्डवर साडेसात तोळ्याचे दागिने खिसेकापुने चोरले..

  ष्टी येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना एका महिलेचे सात तोळ्याचे गंटन चोरट्यानी लंपास केले आहे. ही घटना आष्टी येथिल बस स्थानकात दि.१८ मे रोजी दुपारी ३.३० वा.च्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी शहरातील प्राध्यापक काॅलणीत राहणारे सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.एल.शिंदे हे त्यांच्या पत्नीला पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये बसुन देण्यासाठी आष्टी येथिल बस स्थानकावर आले होते. पुण्याकडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असतांना शिंदे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सात तोळ्याचे गंटन चोरट्यानी तोडले परंतु गंटन तुटून शिंदे यांच्या पत्नीच्या हातावर पडल्याचे सह प्रवाशाने त्यांच्या लक्षात आणुन दिले. गंटन तुटल्याचे पाहुन शिंदे पतीपत्नी बसमधुन खाली उतरले. दरम्यान शिंदे यांच्या पत्नीने तुटलेले गंटन शिंदे यांच्याकडे खिशात ठेवण्यासाठी दिले.शिंदे यांनी तुटलेले गंटन आपल्या पॅटच्या पुढच्या खिशात ठेवले व पुन्हा दुसर्‍या बसमध्ये पुण्याला जाण्यासाठी चढत होते. त्यावेळी चोरट्यानी शिंदे यांच्या पॅन्टचा खिसा कापुन ते गंटन चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत आष्टी पोलिसांना कळविण्यात आले.पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि पञकारांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही तपासले माञ त्यातुन काहीही निष्पन्न झाले नाही.याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असुन आष्टी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

बस स्थानकाची सुरक्षा  अक्षरक्षा; वाऱ्यावर --

आष्टी बस स्थानक हे प्रवाशांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. येथे नविन बस्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बस स्थानकात प्रवाशांसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नेहमीच बसस्थानकात गर्दी असते. या बस स्थानकात पोलिस देखील गस्त करत नाहीत. तर परिवहन महामंडळाने बस स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील काहीच उपयोगाचे नाहीत. परिवहन महामंडळ आणि पोलिसांचे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे दिसुन येते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या