Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवी येथील प्रगतशील महिला शेतकरी विजया घुले यांचा सफरचंद फाळबागेचा यशस्वी प्रयोग


  


  आष्टी शहरापासून ७ कि.लो.अंतरावर केळसांगवी हे गाव आहे.येथील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांना चार एकर जमीन असून त्यातील दोन एकरमध्ये त्यांनी फळझाडे लावली आहेत.त्यांची दोन्ही मुले परगावी नोकरीनिमित्त असतात.गावाकडच्या शेतीची सर्व जबाबदारी त्याच सांभाळतात.त्यांनी २०२० साली १२ बाय १० या अंतरावर हिमाचल प्रदेश येथून हरमन जातीची उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची रोपे आणली.ती रोपे चांगले जोपासून तीन वर्षानंतर आता यावर्षी सफरचंदाला फळ आले आहेत.मोठ्या प्रमाणात फळे आल्याने उष्ण प्रदेशात ही सफरचंदाची शेती होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.एक एकर क्षेत्रामध्ये २४० झाडे लावले आहेत.सध्या प्रत्येक झाडाला दहा ते वीस किलोपर्यंत सफरचंदाची फळे लगडली आहेत.
      आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील पदवीधर असलेला शिक्षक चंद्रकांत घुले यांनी पुढाकार घेऊन आपल्या आईच्या इच्छेनुसार आपल्या शेतामध्ये अमेरिकन ड्रॅगन फूडचे बाग केली आहे.घराशेजारी असलेल्या पाच एकर क्षेत्रापैकी तीन एकर शेतात मिश्र फळबाग केली आहे.ड्रागनफुड,खजुर व सफरचंद या तिन्ही नविन्यपुर्ण फळबागा घुले कुटुंबाने लावली आहे.उष्ण वातावरणात येणारी हर्बन ९९ आणि आण्णा या दोन प्रजातीची सफरचंदाची २४० झाडे लावली आहेत.सफरचंदाची दोन वर्षाच्या वयाची झाडे आहेत.गतवर्षी फळ धरले नव्हते मात्र यावर्षी सफरचंद फळ धरले आहे.सफरचंद बागेपासुन सुमारे ५ लाख उत्पन्न मिळाले.पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती साधू शकतो.राज्यात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी आष्टी तालुक्यातील केळसांगवी सारख्या छोट्याशा खेडेगावात यशस्वी करून दाखवला आहे.विशेष म्हणजे विजया घुले यांच्या पतीचे २००६ साली निधन झाल्यानंतर दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले.एक मुलगा पुण्यात इंजिनिअर तर दुसरा मुलगा येवला (नाशिक) येथे प्राथमिक शिक्षक आहे.तीन वर्षांपूर्वी सफरचंदाची बाग तयार केली आणि आता या बागेचे सफरचंद तोडणी झाली आहे.मराठवाड्यातील वातावरण पोषक नसल्याने सफरचंदाची लागवड केली जात नाही; पण लाखभर रुपये तोट्यात का जाईना, प्रयोग करायला काय हरकत आहे, म्हणत आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील विजया घुले यांनी हिमाचल प्रदेशातून रोपे आणून एक एकरात सफरचंदाची बाग फुलवली आहे.
विजया घुले यांनी २०२० मध्ये हिमाचल प्रदेशातून २०० रुपयाला एक याप्रमाणे २४० रोपे आणली.१० बाय १० वर लागवड केली.
ठिबक सिंचनाची व्यवस्था केली.झाडे मात्र काळजीपूर्वक जोपासली.एका झाडाला ४० ते ५० फळे लगडली असून सध्या एक फळ १०० ग्रॅम वजनाचे झाले आहे.जूनमध्ये हे फळ विक्रीस येईल.झाड, मजुरी, ठिबक असा आजपर्यंत साठ हजार रुपये खर्च एकरात झाला.साधारण २ टन फळे निघाले.हिमाचल प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणे ऑगस्टमध्ये सफरचंदाच्या बागा तोडणीस शेतात मात्र उष्ण प्रदेशामुळे आपल्या भागात मेमध्ये फळे तयार होणार आहे यावेळी सफरचंदाचा दर जास्तीचा असतो.याच सफरचंदाच्या बागेत अंतरपीक म्हणून नवीन प्रयोग करण्यासाठी त्यांनी एका एकरातील शेतात लावलेल्या सफरचंदाच्या बागेत अंतरपीक म्हणून ड्रॅगन फ्रूट लावले आहे तर उर्वरित क्षेत्रात खजुर शेती केली आहे.या फळबागेस काल जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,पत्रकार उत्तम बोडखे,प्रविण पोकळे पोपटराव घुले,सतिष घुले,अमोल घुले आदिंनी भेट दिली.

चौकट
------------
आम्ही लहान असताना आमच्या वडिलांचे निधन झाले.त्यानंतर आईने घरची आणि आमच्या शिक्षणाची जबाबदारी एकटीने खांद्यावर घेत आम्हा दोन्ही भावंडांना उच्च शिक्षण दिले. मी शिक्षक आहे तर दुसरा भाऊ इंजिनियर आहे. दोघेही परजिल्ह्यात नौकरी करतो. मात्र आईने शेतामध्ये विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.आम्ही सुट्टीच्या दिवशी येऊन आईला शेतात मदत करतोत.

  --------  दत्तात्रय घुले
          मुलगा,शिक्षक येवला (नाशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या