आष्टी तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी असलेली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोनाली तोडकर हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार मिळवणारी बीड जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना त्यांचा गौरव म्हणून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.
२०१९- २०२० या कालावधीच्या क्रीडा पुरस्कारासाठी मंगरुळ येथील रहिवाशी असलेल्या सोनाली महादेव तोडकर हीची निवड झाली आहे.सोनाली हिने २०१६ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते . सध्या ती पतियाळा (पंजाब ) येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सराव करते आहे.कुस्ती खेळाचे गाव अशी ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील मंगरूळ गाव. याच गावातील महिला कुस्ती खेळाडू सोनाली महादेव तोडकर हिला यंदाचा महाराष्ट्र शासनाच्या क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) जाहिर झाला आहे.बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मंगरूळ या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबात जन्मलेली सोनाली तोडकर लहान पणापासूनच वेगळं काहीतरी करण्याची मनात उमेद ठेवत शालेय जीवनात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी येथे शिक्षण घेत असतानाच वडिल महादेव तोडकर यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले पुढे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेत असतानाच कुस्तीचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेऊन तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सोनाली तोडकर यांनी चमकदार कामगिरी आशियाई कॉमनवेल्थ स्पर्धेत सोनाली तोडकर हिने भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कुस्ती खेळाडू म्हणून सोनाली तोडकर यांनी आपल्या खेळाचा एक दबदबा निर्माण केला आहे.पुणे येथील विजय बाराटे,संदिप पटारे याच सोबत खऱ्या अर्थाने कुस्तीची तयारी सह्याद्री कुस्ती संकुल वारजे आदी नामवंत प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेऊन कुस्ती कुस्ती खेळात आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे.राज्य शासनाने यंदा कुस्ती खेळात शिवछत्रपती पुरस्कार सोनाली तोडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल लोकनेत्या पंकजा मुंडे ,खा.डा.प्रीतमताई मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आ.
सुरेश धस आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर, तहसीलदार विनोद गुंडमवार, पत्रकारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे. सोनाली तोडकर ही सध्या एनआयएसचे प्रशिक्षण घेत आहे.


0 टिप्पण्या