अटकेची कारवाई भोवली: बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक शासन सेवेतून निलंबित; शासनाचे आदेश जारी ---------------- फोटो ----------------- आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी अविनाश पाठक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांना अटक झाल्याने राज्य शासनाने हे मोठे पाऊल उचलले असून,त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच ७ मे २०२६ पासून ते निलंबित असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (गु.र.नं. ५४४ / २०२५) दाखल करण्यात आला होता.या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांकडून त्यांना ७ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्याला थेट अटक झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते. एका आयएएस अधिकाऱ्याला अटक होऊन पोलीस कोठडी मिळाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेतली.२० मे २०२६ रोजी शासनाने एक विशेष आदेश (शासन आदेश क्रमांक IAS 1026/CR. 23 / IAS-2) जारी केला. या आदेशानुसार, अविनाश पाठक यांना ज्या दिवशी अटक करण्यात आली, त्या ७ मे २०२६ पासूनच त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.या निलंबनाच्या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान केली आहे. अपर आयुक्त (महसूल) यांनी काढलेल्या पत्रानुसार, शासनाचे २० मे २०२६ चे निलंबनाचे आदेश तातडीने अविनाश पाठक यांच्यावर बजावण्यात यावेत. तसेच,हे आदेश प्राप्त झाल्याची त्यांच्या स्वाक्षरीची दिनांकित पोहोचपावती तत्काळ शासनास सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखपदी राहिलेल्या अधिकाऱ्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागणे आणि त्यानंतर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणे,ही बीडच्या प्रशासकीय इतिहासातील एक मोठी घटना मानली जात आहे. शासनाच्या या कठोर भूमिकेमुळे भ्रष्ट व अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी काय खुलासे होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी अविनाश पाठक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांना अटक झाल्याने राज्य शासनाने हे मोठे पाऊल उचलले असून,त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच ७ मे २०२६ पासून ते निलंबित असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (गु.र.नं.५४४/२०२५) दाखल करण्यात आला होता.या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांकडून त्यांना ७ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली.त्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्याला थेट अटक झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते.
एका आयएएस अधिकाऱ्याला अटक होऊन पोलीस कोठडी मिळाल्याने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याची गंभीर दखल घेतली.२० मे २०२६ रोजी शासनाने एक विशेष आदेश (शासन आदेश क्रमांक IAS 1026/CR. 23 / IAS-2) जारी केला.या आदेशानुसार,अविनाश पाठक यांना ज्या दिवशी अटक करण्यात आली,त्या ७ मे २०२६ पासूनच त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.या निलंबनाच्या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान केली आहे.अपर आयुक्त (महसूल) यांनी काढलेल्या पत्रानुसार, शासनाचे २० मे २०२६ चे निलंबनाचे आदेश तातडीने अविनाश पाठक यांच्यावर बजावण्यात यावेत. तसेच,हे आदेश प्राप्त झाल्याची त्यांच्या स्वाक्षरीची दिनांकित पोहोचपावती तत्काळ शासनास सादर करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखपदी राहिलेल्या अधिकाऱ्याला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागणे आणि त्यानंतर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणे,ही बीडच्या प्रशासकीय इतिहासातील एक मोठी घटना मानली जात आहे.शासनाच्या या कठोर भूमिकेमुळे भ्रष्ट व अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी काय खुलासे होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
0 टिप्पण्या