आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पाअंतर्गत समुद्रात वाहून जाणाऱ्या २०० टीएमसी पाण्यापैकी १५ ते २० टीएमसी पाणी आष्टी पाटोदा शिरूर या दुष्काळी भागाला मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आ.भीमराव धोंडे आणि माजी आ.बाळासाहेब आजबे यांनी शिष्टमंडळा मार्फत जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश,नाशिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,


माजी आ.भीमराव धोंडे व माजी आ.बाळासाहेब आजबे यांच्यासह शिष्टमंडळात १०० पेक्षा जास्त शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नाशिकचे विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा व शिरूर (कासार) तालुके मराठवाड्यातील अतिशय अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात.या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण होते.परिणामी येथील नागरिकांना पिण्याच्या व शेती पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.रोजगाराच्या अभावामुळे अनेकांना ऊसतोड व इतर कामांसाठी स्थलांतर करावे लागते.या भागात जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे येथील जनतेचे जीवनमान अत्यंत कठीण बनले आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी देखील समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.त्या अनुषंगाने समुद्रात वाहून जाणारे पाणी या तीन तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मिळाल्यास दुष्काळी भागातील जवळपास २०० गावांना याचा फायदा होईल.
यावेळी तालुक्यातील दुष्काळी भागाला समुद्रात वाहून जाणाऱ्या २०० टीएमसी पाण्यापैकी १५ ते २० टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश,नाशिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिले.
या शिष्ट मंडळामध्ये
काकासाहेब शिंदे,दीपक घुमरे,विश्वास नागरगोजे,नियामत बेग, रत्नदीप निकाळजे,अशोक साळवे,भाऊसाहेब लटपटे,
पांडुरंग नागरगोजे,रामराव खेडकर,दादासाहेब जगताप,उत्तम बोडखे,सतिशमामा झगडे,झुंबर चव्हाण,बजरंग कर्डीले,उद्धव विधाते,शहादेव गर्जे,बाबासाहेब वाघुले,केशव शिंदे,अशोक खेडकर,अंकुश मुंढे,संतोष गोल्हार,शहादेव गर्जे,सुरेश माळी, महादेव दानवे,चेअरमन राजाराम ननवरे,हरिभाऊ जंजिरे,पांडुरंग गावडे,नानाभाऊ वाडेकर,विठ्ठल लांडगे,दिपक घुमरे,बाबुराव जाधव,अनिल जायभाय,बाळासाहेब शेकडे,संदीप नागरगोजे, सागर वनवे,शाम हुले,तात्यासाहेब लाड,सचिन जायभाय,भागवत वारे,सावळेराम जायभाय,
अभिलाश गाडैकर,वैभव बडे,महारूद्र खेडकर,डॉ.प्रभाकर कवठेकर,कचरू काळे,तात्यासाहेब लाड आणि शिवाजी थोरवे आदींचा समावेश आहे.
---------------
चौकट
--------
आष्टी पाटोदा शिरूरमधील
२०० गावांना होईल फायदा
-------------
वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी २० टीएमसी पाणी जर या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली तर आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील सुमारे २०० गावाहून अधिक गावांना फायदा होईल.यामुळे माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.बाळासाहेब आजबे काका यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीला सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून मोठ्या अपेक्षेने या अधिकारी,नेत्यांच्या आणि शासनाच्या अपेक्षेपुर्तेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान,या नव्या मागणीमुळे वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या आष्टी,पाटोदा आणि शिरूरकरांच्या आशा तहान भागवण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
---------------
0 टिप्पण्या