Ticker

6/recent/ticker-posts

डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा केसरी अजय बनराला यांच्यात रंगली तीन लाख रु.ची अंतीम कुस्ती कुस्ती -------------------------- पैलवान हर्षवर्धन सदगीरने हरियाणा केसरी बनराला दाखवले अस्मान

आष्टी (प्रतिनिधी) कडा येथील यात्रा ही संपूर्ण आष्टी तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून समजली जाते.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा मोठा आखाडा भरविला जातो.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.यावर्षी माजी आ.भीमराव धोंडे हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुस्त्या पाहण्यासाठी थांबले.यावर्षी कडा येथील मौलालीबाबा यात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमची उभारणी केली होती.दुपारी ४ ये रात्री ९ वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा रंगला होता.डबल महाराष्ट्र केसरी'हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा केसरी अजय बनराला यांच्यात रंगली तीन लाख रु.कुस्ती रंगली.सदगीरने बनराला धोबी पछाड देत कुस्ती जिंकली.पैलवान हर्षवर्धन सदगीरने हरियाणा केसरी बनराला अक्षरशा दाखवले अस्मामान दाखविले.दूरवरून आलेले खेळणी दुकाने रहाट पाळणे व इतर दुकानांसाठी सरपंच युवराज पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जागेची साफसफाई करून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवसायिकांची अडचण झाली नाही.कडा येथील यात्रा उत्सव दरम्यान महिला मल्ल मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.शनिवारी चितपट कुस्त्यांचा जंगी सामना कुस्ती प्रेमींना पहावयास मिळाला. महाराष्ट्राचा रांगडा खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्तीच्या डाव प्रतिडावाने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.या आखाड्यात शेवटची कुस्ती ३ लाख रुपयांची नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हरियाणाचा अजय बनराला यांच्यात रंगली तीन लाख रु.कुस्ती झाली.या कुस्तीचा ३ लाख रुपयांचा इनाम यात्रा कमिटी व मान्यवरांच्या हस्ते देऊन दोन्हीही मल्लांचा गौरव केला.या मैदानाचे मुख्य आकर्षण 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीर आणि हरियाणा केसरी अजय बनराला यांच्यातील झालेली कुस्ती...आणि लढत.. हालगीचा आवाज,प्रेक्षकांची तुफान गर्दी,आडदांड मल्लाची उपस्थिती दोन दोन मिनिटाला चितपट होत असलेल्या कुस्तीने खरोखरच कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे पारणे फिटले.कडा गावातील उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या भूमिपुत्रांनी काही कुस्त्या या महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या ठरवून लावलेले होत्या.या कुस्त्यांचे बक्षिसेही त्याच भूमिपुत्रांनी दिली.इतर ३०० कुस्त्यांचा इनाम यात्रा कमिटीने दिले. आष्टी तालुक्यातील कडा येथील सर्व धर्म समभावाचे प्रतिक म्हणून असलेल्या मौलालीबाबा यात्रेला बौद्ध पोर्णिमापासुन सुरवात झाली आहे.याच यात्रेनिमित्त शनिवारी जंगी कुस्ती सामने रंगले.अ.नगर,पुणे,करमाळा, बीड,पाथर्डी,आष्टी,दिल्ली, हरियाणा,पंजाब अकलूज यासह अनेक ठिकाणावरून आलेल्या मल्लांनी शौकिनांना खुष केले.दंवडीची कुस्ती ही तीन लाख रुपयांची होऊन आखाडा संपवला.यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,सरपंच युवराज पाटील,उपसरपंच दीपक कर्डीले,सभापती रमजान तांबोळी,माजी सरपंच अनिल ढोबळे,माजी सरपंच रामशेठ मधुरकर,योगेश भंडारी,डॉ.महेंद्र पटवा,यशवंत खंडागळे,सरपंच परिवंत गायकवाड,अशोक चौधरी प्रा.डॉ.बाळासाहेब धोंडे,कैलास वायभासे,बाळासाहेब शेंदूरकर,सदाशिव दिंडे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.डॉ.विनोद ढोबळे,प्रवीण पोकळे,शरद रेडेकर,रघुनाथ कर्डिले,राजेश राऊत,नितीन कांबळे,पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत,संजय गाढवे,संदीप खाकाळ,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,सचिन घावटे,किरण काळे,आण्णा नाथ,कड्याचे माजी सरपंच रामशेठ मधुरकर, योगेश भंडारी,संभाजी कर्डीले,बबलू पानसरे,माजी सभापती संजयनाना ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य,यात्रा कमिटी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. या भव्य कुस्ती महोत्सवात एकूण २० महत्त्वाच्या लढती पार पडल्या.प्रथम क्रमांकाची कुस्ती (३ लाख रुपये) हर्षवर्धन सदगीर (नाशिक) विरुद्ध अजय बनराला(हरियाणा),द्वितीय क्रमांकाची कुस्ती (२ लाख रुपये),शुभम सिदनाळे (पुणे) विरुद्ध माऊली जमदाडे (कोल्हापूर),तृतीय क्रमांकाची कुस्ती (१.५ लाख रुपये), सुदर्शन कोतकर (अहिल्यानगर) विरुद्ध वैभव माने (माळशिरस),चौथ्या क्रमांकाची कुस्ती (१ लाख रुपये),मनोज पवार (आष्टी) विरुद्ध भागवत निरगुडे (अहिल्यानगर ) पार पडल्या.इतरही चुरशीच्या लढती झाल्या यामध्ये ५१ हजार ते २१ हजार रुपयांच्या इनामांसाठी राज्यातील अनेक नामवंत मल्ल आमनेसामने आले.यामध्ये प्रामुख्याने मयूर कचरे (परभणी) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर),अमोल भिंसे (मंगरुळ) व विरुद्ध उमेश शिंदे (कोल्हापूर),इरफान सय्यद (बीड) विरुद्ध बाळू बहिराव (बीड),साहील सय्यद (आष्टी) विरुद्ध शंभू काजळे (पुणे) यांच्यासह राहुल पोकळे,सद्दाम शेख,तुषार खंडवे,महेश जगताप आणि इतर नामवंत मल्लांच्या लढतींचा थरार कुस्तीप्रेमींना पाहायला मिळाला.यावेळी पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह कडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.यामध्ये अहिल्यानगर,
पुणे,सोलापूर, करमाळा, अकलूज आदी ठिकाणचे मल्ल उपस्थित होते. -------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या