Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथील संत मदन महाराज संस्थानात अधिक मासानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ ---------------- ह.भ.प.बबन महाराज बहिरवाळ यांच्या वतीने 'धोंडे जेवण' व स्नेहभोजनाचा रंगला सोहळा; मान्यवरांची मोठी उपस्थिती

कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील जागृत देवस्थान असलेल्या संत मदन महाराज संस्थानात आज मंगळवार,दि.१९ मे २०२६ रोजी अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा मोठ्या भक्तीमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला.या मंगल पर्वाचे औचित्य साधून ह.भ.प.बबन महाराज बहिरवाळ यांच्या वतीने भाविकांसाठी 'आमरस व धोंडे जेवणाचे'तसेच भव्य स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्मात अधिक मासाला (पुरुषोत्तम मास) विशेष महत्त्व आहे.या महिन्यात दान-धर्म आणि नामस्मरणाला मोठे महत्त्व असल्याने कडा येथील संत मदन महाराज देवस्थान येथे आजपासून अखंड हरिनाम आणि ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात झाली. या पारायणासाठी परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने बसले असून,संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.याच पर्वावर ह.भ.प. बबन महाराज बहिरवाळ यांनी आयोजित केलेल्या आमरस आणि धोंडे जेवणाच्या पंगतीचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. या भक्तीमय सोहळ्यासाठी कडा शहर व परिसरातील राजकीय,सामाजिक,धार्मिक,कृषी,व्यापार आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली.
यामध्ये प्रामुख्याने प्रवचनकार,कीर्तनकार,संत मदन महाराज यांचे भक्त,शहरातील प्रमुख पदाधिकारी,व्यापारी,प्राध्यापक,डॉक्टर, वकील आणि पत्रकार यांचा समावेश होता. या सोहळ्याप्रसंगी वारकरी संप्रदायातील ह.भ.प.निवृत्ती महाराज बोडखे,ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे, ह.भ.प.संतोष महाराज मोरे,ह.भ.प.दादा महाराज चांगुने, ह.भ.प.मोहन महाराज आमटे,ह.भ.प.अनिकेत महाराज चांगुने,ह.भ.प.विश्वनाथ महाराज चांगुने, पांडुरंग कर्डिले महाराज,सुभाष महाराज सोनवणे आदी महाराज मंडळींची व कीर्तनकारांची विशेष उपस्थिती होती.तसेच सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांमध्ये डॉ.संदीप टेकाडे,विवेकानंद शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण पाटील,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय मेहेर,सुभाष सोनवणे (मामा),पी.टी.चौधरी,संजयनाना ढोबळे,भाऊसाहेब भोजने, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,प्रा.श्याम सांगळे,पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार रघुनाथ कर्डिले,पत्रकार राजेश राऊत,सागर ढोले,दिनेश पोकळे वि.भा.साळुंखे,चेअरमन काकासाहेब कर्डिले आदींनी या स्नेहभोजनात सहभाग नोंदवून या धार्मिक उपक्रमाची शोभा वाढवली. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या