Ticker

6/recent/ticker-posts

दिलेला शब्द पाळणारा नेता': राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृहासाठी माजी आ.भीमराव धोंडे यांची भरीव मदत

आष्टी (प्रतिनिधी) गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासनात व शासनात मोठी पदे भूषवावीत या हेतूने आष्टी-पाटोदा -शिरूर तालुक्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी येथील 'राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृहा'साठी भरीव आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष देत त्यांनी आपला शब्द पाळल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी आ.भीमराव धोंडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.गावोगावी शाळा,महाविद्यालये आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण करून त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची दारे खुली केली आहेत.विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी आणि त्यांच्या शिक्षणात कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये,यासाठी त्यांनी राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृहाच्या उभारणीत सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती.वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांनी जी भरीव आर्थिक मदत जाहीर केली होती.ती रक्कम नुकतीच त्यांनी मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यावेळी निधी स्वीकारताना इंजि.तानाजी जंजिरे तालुकाध्यक्ष,मराठा सेवा संघ, लक्ष्मण रेडेकर कार्याध्यक्ष,ॲड. सीताराम पोकळे, बन्सीधर मोरे, प्रा.डॉ.दत्ता नरसाळे हे उपस्थित होते. चौकट ---------- 'शब्दाला जागणारे नेतृत्व' ------------- या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल प्रतिक्रिया देताना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी जंजिरे म्हणाले की, राजकारणात अनेक आश्वासने दिली जातात,मात्र'दिलेला शब्द पाळणारा नेता'म्हणून भीमराव धोंडे यांची ओळख आहे. त्यांनी सामाजिक जाणिवेतून ही मदत केली आहे. वसतिगृहाच्या बांधकामासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी दिलेल्या या बहुमोल सहकार्याबद्दल संपूर्ण मराठा सेवा संघ टीमच्या वतीने माजी आमदार भीमराव धोंडे
यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या