Ticker

6/recent/ticker-posts

महेश सह.साखर कारखान्यात गळीत हंगामची लगबग; १८ मे पासून तोडणी-वाहतूक करारांना सुरुवात

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा येथील 'महेश सहकारी साखर कारखाना लिमिटेड'ने आगामी गळीत हंगाम २०२६-२७ साठीची जय्यत तयारी आतापासूनच सुरू केली आहे.या हंगामासाठी आवश्यक असणारे ऊस तोडणी आणि वाहतुकीचे करारनामे येत्या सोमवार दि.१८ मे २०२६ पासून अधिकृतरीत्या सुरू करण्यात येणार आहेत.ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार हे कोणत्याही साखर कारखान्याचा कणा असतात.आगामी गळीत हंगामाचे नियोजन अचूक आणि वेळेत पूर्ण व्हावे,या उद्देशाने महेश सह.साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने पावले उचलली आहेत.कारखान्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार,बैलगाडी,ट्रक तसेच ट्रॅक्टरद्वारे ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या सर्व ठेकेदारांसाठी हे करार खुले करण्यात आले आहेत.इच्छुक ऊस तोडणी आणि वाहतूक कंत्राटदारांनी कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या 'शेतकी कार्यालयाशी' संपर्क साधावा. हे कामकाज सुट्टीचे दिवस वगळून इतर सर्व कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहील. करारासंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास कंत्राटदारांना कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री.वीरेंद्र गर्जे (मोबाईल क्र.९३५६४६७३०८) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त तोडणी व वाहतूक ठेकेदारांनी वेळेत आपले करारनामे पूर्ण करून कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि मुख्य शेतकी अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या