
आष्टी (प्रतिनिधी)
रागावणार्या माणसांचे हृदय आईप्रमाणे असते.प्रा.डॉ.शाम सांगळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला तीन माजी आमदारांनी उपस्थित राहणे,ही त्यांच्या कार्याची खरी पावती आहे असे प्रतिपादन आळंदी (पुणे) येथील पुरोगामी विचारांचे सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार शिवनेरी भूषण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी केले.ते आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.डॉ.शाम तुकाराम सांगळे यांच्या सेवापूर्ती व 'चक्रवर्ती शाम' या गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.आनंद चॅरिटेबल संस्था,आष्टी संचलित आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार भीमराव धोंडे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे उपस्थित होते.
'शाम सांगळे यांनी नोकरीसोबतच सामाजिक,धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले'
अध्यक्षीय भाषणात माजी आ.भीमराव धोंडे यांनी प्रा. डॉ. सांगळे यांच्या ३४ वर्षांच्या अखंड व प्रामाणिक सेवेचा गौरव केला. ते म्हणाले, "डॉ.सांगळे यांची संपूर्ण नोकरी एकाच गावात (कडा) झाली,हे त्यांचे भाग्य आहे.त्यांनी केवळ नोकरी केली नाही तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले.आजची ही अलोट गर्दी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची साक्ष देत आहे.या महाविद्यालयातून हजारो आदर्श नागरिक,उच्चपदस्थ अधिकारी आणि समाजसेवक घडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी आ.भीमराव धोंडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले,"शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून कडा येथे लवकरच 'पॉलिटेक्निक कॉलेज' सुरू केले जाईल.ग्रामीण भागातील युवकांना सैन्य आणि पोलीस दलात प्रवेश मिळवता यावा यासाठी महाविद्यालयात 'भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र'ही उभारण्यात येईल.माजी आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की,शाम सांगळे हा माणसातला माणूस आहे.त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड असल्याने, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आता राजकारणात यावे.
तर माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,डॉ.सांगळे यांनी आजवर अत्यंत चांगले व निरोगी जीवन जगले आहे. असेच आरोग्यदायी आयुष्य जगून त्यांनी शंभरी गाठावी.यावेळी ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल म्हणाले की,प्रा.डॉ. सांगळे यांनी अनेक क्षेत्रांत उत्कृष्ट ठसा उमटवला आहे.
ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने समजण्यासाठी
धार्मिक वृत्ती हवी
--- ह.भ.प.वाबळे महाराज
तत्पूर्वी,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला.जगात ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत,ही राष्ट्रसंत गाडगेबाबांची दूरदृष्टी होती.'शाम' म्हणजे सायंकाळ,पण डॉ.सांगळे यांनी अखंड परिश्रम करून डॉक्टरेट मिळवली आणि समाजात नाव कमावले,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.वारकरी संप्रदायावर भाष्य करताना ते म्हणाले,"सध्या बाहेरचे महाराज राज्यात येऊन संप्रदाय संपवायला निघाले आहेत,अशा वेळी आपण जागृत राहायला हवे.वाचन करणारा माणूस धार्मिक वृत्तीचा असेल, तरच त्याला ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने समजते."
सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.शाम सांगळे अत्यंत भावुक झाले.त्यांनी संस्था,सर्व सहकारी प्राध्यापक आणि ग्रामस्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथपाल प्रा.डॉ. धर्मराज वीर, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,माजी सभापती साहेबराव म्हस्के,सरपंच भीमराव पाटील,हरिभाऊ जंजिरे,बाबुशेठ भंडारी,भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,अशोक साळवे, दादासाहेब जगताप,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे, सुनील नाथ,राजेंद्र धोंडे,निवृत्ती महाराज बोडखे,संतोष महाराज मोरे, दादा महाराज चांगुणे,मोहन महाराज आमटे,निळकंठ महाराज तावरे,आदिनाथ महाराज दानवे,हौसराव महाराज मगर,पांडुरंग महाराज भालके,अनिल महाराज बाबर,दिपाली महाराज खिळे, जालिंदर महाराज नरोडे,शिवाजी महाराज देसाई, पांडुरंग महाराज कर्डिले,अनिकेत महाराज चांगुणे,कारभारी महाराज धस,प्रवीण महाराज तरटे,ज्ञानेश्वर महाराज भवर, भागचंद महाराज झांजे, दीपक महाराज चितळे,मुंबईच्या पोलीस उपअधीक्षक मंदाताई घोगरे,प्रदीप चव्हाण,शिवाजी सुरवसे, सावता ससाणे,कांतीलाल गव्हाणे,अनिलतात्या ढोबळे,संजयनाना ढोबळे,हेमंत पोखरणा,योगेश भंडारी,बिपिन भंडारी,भानुदास बोडखे,संदीप काकाळ,शेख अन्सारभाई, डी.बी.राऊत,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,बाळासाहेब कर्डिले,सुरेश मिरगणे,सुदामकाका झिंजुर्के,बजरंग कर्डिले, विठ्ठल नरवडे,गौतम सावंत,गोरक्ष तावरे,विकास धर्माधिकारी, राहुल जाधव यांच्यासह अनेक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर,प्रा.सांगळे यांचे नातेवाईक व मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.बापू खैरे,प्रा.डॉ.गोपीनाथ बोडखे आणि प्रा.डॉ.विनोद ढोबळे यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा.डॉ.शाम सांगळे व त्यांच्या पत्नी सौ. चक्रवर्ती सांगळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला,त्यांच्या जीवनप्रवासावरील चक्रवर्ती शाम या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
------------------
0 टिप्पण्या