आष्टी तालुक्यातील
कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ.शाम तुकाराम सांगळे यांचा आज सेवापूर्ती व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा होत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आनंद चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे भूषवणार आहेत.यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी पुणे) यांचे किर्तन होणार आहे.वाबळे महाराज हे आपल्या कीर्तनातून छत्रपती शाहू महाराज,म.जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व पुरोगामी विचारांवर प्रकाश टाकणार आहेत.या महामानवांच्या विचारांची आजच्या समाजाला असणारी गरज ते आपल्या निरुपणातून करणार आहेत. त्यानंतर मुख्य कार्यक्रम आणि पुस्तक प्रकाशन होणार आहे.या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले आहे.


----------------
शेतकरीपुत्र प्रा.डॉ.श्याम सांगळे सर अभ्यासाच्या जोरावर उच्च पदस्थ झाले आहेत.आष्टी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव अधोरेखित करीत स्वतःच्या कुटुंबासह समाज व्यवस्थेतील अनेकांच्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि त्याचे महत्त्व सांगून नवा अध्याय रचणारे
प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांचा नामोल्लेख करण्यासारखा आहे.काॕलेजमधील ग्रंथपाल पदावर प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे काम केल्यानंतर
प्रा.डॉ.श्याम सांगळे सर आज सेवानिवृत्त होत आहेत.प्रा.डॉ. श्याम सांगळे यांनी एका शेतकरी कुंटुंबात जन्म घेतल्यानंतर प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतसुद्धा यशोशिखर गाठले आहे.दि.२३ मे १९६६ रोजी प्रा.डॉ.श्याम सांगळे सरांचा जन्म झाला.पहिली पासून प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासह उच्च शिक्षण त्यांनी चांगल्या गुणांनी पार पाडले.बी.लीप.,एम.लीप.पदवी घेतल्यानंतर त्यांनी ग्रंथपाल म्हणुन कर्तव्य सेवा बजावली.कडा येथील शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित अशा आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात त्यांनी ही सेवा अत्यंत सन्मानाने आणि प्रमाणिकपणे केली.आई वडिलांच्या कठोर परिश्रम जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या प्रेरणेतून त्यांनी अनेक मुलांना शिक्षण आणि संस्काराचे धडे दिले वडील शेती व्यवसाय करत असले तरी मुलांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि घराण्याचे नाव कमवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती.ती इच्छा प्रा.डॉ.श्याम सांगळे सर
यांनी पूर्ण केली आहे.प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांच्या शिक्षण क्षेत्रातील यश आणि प्रगती पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचा मोठा आधार,त्याग आहे.आईवडीलांचे तसे शिक्षण जेमतेमच म्हणावे लागेल पण शिक्षणाचे महत्व काय आहे ते त्यांना नक्कीच माहित होते.कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते.ती शिस्त त्यांनी आपल्या मुलांना अगदी प्राथमिक शाळेत असल्या पासून लावण्याचे काम केले.
दोघेही कडक शिस्तिचेच पण प्रेमळ.मार्गदर्शन आणि मुलांवर किती कटाक्षानं लक्ष असायला पाहिजे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांचे मातापिता.
३४ वर्षाहुन अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले एक शिस्तप्रिय शांत संयमी प्राध्यापक असा नावालौकीक प्राप्त करणारे
प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांचा आज दि.३० मे २०२६ रोजी ३४ वर्षाचा सेवाकाल पुर्ण करुन आज ते सेवानिवृत्त होत आहेत.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही अंत्यत शांत संयमी, मातृहृदयी माणसंच प्रभावीपणे कार्य करतात.प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांना सामाजिक क्षेत्रातही आवड असल्याने ते नेहमी सामाजिक कार्यात सामाजिक जाणिवेतुन काम करतात.प्रा.डॉ.श्याम सांगळे सर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने धार्मिक कार्यात सक्रिय असतात.परोपकारी वर्तवणुक असल्याने समाजात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झालेले आहे.सेवानिवृत्त होत असलेले प्रा.डॉ.श्याम सांगळे सर यांच्या पत्नी सौ.चक्रवर्ती सांगळे या आदर्श गृहिणी आहेत.कडा येथील शेतकरी कुटुंबात २३ मे १९६६ रोजी त्यांचा जन्म झाला.त्यांचे शालेय जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले.उच्च शिक्षण आजचे तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन कला वाणिज्य महाविद्यालय सध्याचे हंबर्डे महाविद्यालयात झाले.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शरदचंद्र पवार लायब्ररी सायन्स महाविद्यालयांमध्ये १९९२ मध्ये शिक्षण झाले यावेळी विद्यापीठ स्तरावर पाचव्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाले होते.एम.कॉम. १९९३ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये झाले.जून १९९२ मध्ये तत्कालीन आमदार तथा शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भीमराव धोंडे यांनी कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात ग्रंथपाल (लायब्रियन) म्हणून नोकरीत घेतले.सन २००३ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मध्ये मास्टर ऑफ लायब्ररीयन (m.Lib.),सन २०१२ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये एम.फील.केले.सन २०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली.छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एचडी मार्गदर्शक म्हणून सन २०१९ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१७ मध्ये कडा येथील धोंडे महाविद्यालयात नोकरीत कायम झाले.विविध दैनिकाचे पाच वर्ष कडा येथील प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे.कडा येथे रोटरी क्लब ऑफ कराचे सलग १० वर्ष सदस्य राहिले.२००७ ते २००८ या काळात सचिव म्हणून काम पाहिले.कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून खडकत येथे काम केले आहे.महेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक,कडा ग्रामपंचायत सदस्य ही पदे यांनी भूषवली आहेत.पीएच.डी.गाईड म्हणून त्यांनी काम केले आहे.आतापर्यंत त्यांनी पाच विद्यार्थ्यांना गाईड केले आहे.कडा येथील धोंडे महाविद्यालयातून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या शेतकरीयन या वार्षिक अंकाचे (सन १९९६ ते २००१) सहसंपादक म्हणून कार्य केलेले आहे.बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रसंचालक म्हणून एक वर्ष काम केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेसाठी वरिष्ठ महाविद्यालयातील अंडरस्टडी म्हणून काम केले आहे. विद्यापीठ विद्यापीठस्तरावरील ॲपिलेशन कमिटीमध्ये तीन वेळा सदस्य म्हणून काम पाहिले आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रंथपालशास्त्र हा विषय शिकवला आहे.कडा येथील महाविद्यालयामध्ये एचएससी वेळापत्रक मराठवाडा साहित्य संमेलन आयोजन समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे.या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडी आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणूनही सांभाळले होते.कडा शहरातील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक चेअरमन आहेत.या पतसंस्थेच्या माध्यमातून २६ वर्षापासून पतसंस्थेचे दिनदर्शिका सभासद,व्यापारी,नागरिकांना मोफत वाटप करण्याचा उपक्रम अखंड सुरू आहे.या पतसंस्थेच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम राबवला जात आहे.स्त्री जन्माचे स्वागत करूया हे धोरण घेतले आहे. शैक्षणिक कार्याबरोबर सांगळे यांनी पूरग्रस्तांसाठी मदत फेरी, कोरोना काळात गरजूंना किराणा किट वाटप केले.स्वतःच्या शेतीत खजूर व चंदन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.कडा येथील दलितवस्ती मध्ये स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.फळबाग लागवडीसाठी परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरे घेतले आहेत.प्रधानमंत्री कौशल्य विकास, कुपोषित महिला मार्गदर्शन केले आहे.कडा येथील श्रीराम वाचनालय समितीत सदस्य म्हणून काम केले आहे तसेच शारदीय व्याख्यानमाला व्याख्यानमाला समितीमध्ये सहभाग घेतलेला आहे.ग्रामपंचायत अंतर्गत वृक्षारोपण हागणदारीमुक्त ग्राम योजना,सहभाग सहकार बोर्ड मार्फत सहकार चळवळीची जनजागृती केली आहे.कडा येथील ग्रामदैवत असलेल्या महेश मंदिर ट्रस्ट (न्यास) चे ते सदस्य विश्वस्त आहेत.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शाखा कडाचे समंत्रक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अजीवन शिक्षण विभाग आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे समन्वयक आहेत.महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक आणि मास्टरमाईंड अकॅडमीत सहभाग,आदर्श गाव सराटेवडगाव येथे पाणी फाउंडेशन चळवळीत सहभाग,
शालेय जीवनातील पहिली या वर्गाचे गुरु व पीएच.डी.च्या गुरुचा सपत्नीक गुरुपूजन करून गौरव केला.२०१७ सालचा अहिल्यानगर येथील शिवशंभो राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,म.फुले शिक्षण परिषदेचा पुरस्कार मिळालेले आहेत.२३ फेब्रुवारी २०१९ रोजी वाढदिवसानिमित्त मरणोत्तर अवयदान संकल्प केला आहे.महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेकदा ग्रंथ प्रदर्शनाच्या आयोजन केले आहे.महाविद्यालयात नोकरी करत असताना विविध समित्यावर काम केले आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीवर केअर टेकर म्हणून तसेच माजी विद्यार्थी समितीवर पदाधिकारी म्हणून काम केले आहे.शहरामध्ये कडा मित्रांच्या आग्रहास्तव सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता.शेतकरी शिबिर,शालेय साहित्य वाटप,नेत्रतपासणी शिबीर आयोजित केलेले आहे.मोठ्या प्रमाणात पर्यटन केले आहे.शोधनिबंध सादर केलेले आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे. ग्रंथालय शास्त्र या विषयावर नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केलेले आहे.आज सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त चक्रवर्ती श्याम गौरव ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.प्रा.डॉ.श्याम सांगळे यांच्या सेवापूर्ती सोहळ्या निमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा...
--- उत्तम बोडखे,
(आष्टी)
--------------------
0 टिप्पण्या