Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : प्राचार्य डॉ. हरिदास विधाते सर!

शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही,तर ते समाज परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी अस्त्र आहे.विश्वामध्ये ज्या-ज्या वेळी शिक्षणाची क्रांती झाली,तेव्हा-तेव्हा प्रगतीची आणि परिवर्तनाची नवी पहाट उजाडली आहे.सर्वसामान्य, गोरगरीब,वंचित आणि ग्रामीण भागातील जनतेला याच शिक्षणाने स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि ऐक्याची दिशा दाखवली.छत्रपती शिवाजी महाराज,म.जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या महापुरुषांनी शिक्षणातूनच समाजाचा उद्धार केला.डॉ.आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत हा विचार खऱ्या अर्थाने रुजविण्याचे काम ज्या व्रतस्थ शिक्षकांनी केले,त्यात एक अग्रगण्य नाव म्हणजे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते सर! सर्वसामान्य आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून येत असताना, शिक्षणाची कास धरून त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने स्वतःची वाटचाल निश्चित केली.जिद्द,चिकाटी,प्रचंड आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमांच्या बळावर त्यांनी उच्च पदव्या संपादन केल्या.केवळ शैक्षणिक गुणवत्ता मिळवून ते थांबले नाहीत,तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथे सिनेट सदस्य,विद्या परिषद सदस्य,वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषद सदस्य अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वी आणि कार्यक्षम कारकीर्द घडवली.त्यांची ही वाटचाल म्हणजे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि अफाट बौद्धिक क्षमतेची साक्ष आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या पदाचा नाही,तर त्यांच्यातील प्रचंड ध्येयवाद,सामाजिक बांधीलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या स्नेहभावाचा आहे.बीड जिल्ह्यासारख्या भागातील कडा येथील 'आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी वरिष्ठ महाविद्यालयाचे' प्राचार्य म्हणून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ अत्यंत प्रभावीपणे धुरा सांभाळली आहे.त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या ठायी असलेला जिव्हाळा व आपुलकी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो.डॉ.विधाते सरांमुळे हजारो विद्यार्थी आज सक्षम बनून स्वावलंबी आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत. केवळ स्वतः काम न करता,आपल्या सोबतच्या प्राध्यापक वर्गालाही त्यांनी एका सूत्रात बांधले आहे.विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तळमळीने आणि आपुलकीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांची एक उत्कृष्ट फळी त्यांनी उभी केली. याच सामूहिक प्रयत्नांमुळे आज कडा येथील या महाविद्यालयाने गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्राच्या नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे,ज्याचा सार्थ अभिमान संपूर्ण कडावासीयांना आहे.आनंद चॅरिटेबल संस्था आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि माजी आमदार आदरणीय भीमराव धोंडे यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली,प्राचार्य डॉ.विधाते यांनी संस्थेचे मोठे हित साधले आहे.राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसा जपत,गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला शिक्षणाचा आधार मिळवून देत तरुणांना सशक्त करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्या या निस्वार्थ आणि समर्पित सेवेची दखल घेत त्यांना आतापर्यंत अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘आदर्श पुरस्कारांनी’सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या राष्ट्रउभारणीच्या आणि समाजोपयोगी कार्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..! चौकट -------- आज आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी वरिष्ठ महाविद्यालय, कडा येथील प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रोफेसर डॉ.हरिदास विधाते सर आणि प्रा.सौ.मंगल विधाते मॅडम यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.त्यांनी आतापर्यंत केलेल्या अतुलनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व विशेष कौतुक करण्यात आले. शब्दांकन ----- उत्तम बोडखे, (ज्येष्ठ पत्रकार,आष्टी)
---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या