Ticker

6/recent/ticker-posts

बेलगाव येथे युवा नेते सागर धस यांच्या हस्ते सिमेंट रस्ता व सिमेंट बंधाऱ्याचे झाले भूमीपुजन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता व सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन आज रविवार दि.५ एप्रिल रोजी युवा नेते सागर धस यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतीश पोकळे,माजी सरपंच जयसिंग पोकळे,ज्येष्ठ पत्रकार ॲड.सीताराम पोकळे,भाजपाचे ज्येष्ठनेते कल्याण पोकळे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शक श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे,भाऊसाहेब पोकळे,माजी उपसरपंच सदाशिव पोकळे,माजी प्राचार्य भाऊसाहेब ढोबळे,युवा उद्योजक प्रवीण वारे,उद्योजक ज्ञानेश्वर पोकळे,माजी सरपंच सुनील ढोबळे,एकनाथ पोकळे,दगडूदादा पोकळे,गणेश खोटे, विक्रमबापू पोकळे,रवींद्र ढोबळे,दादासाहेब पोकळे, पोपट खंडागळे,संपत पोकळे,शिवम पोकळे,राजू खंडागळे,सुदाम पोकळे,शरद पोकळे दादासाहेब पोकळे,मारुती सरोदे,शिवाजी पोकळे,काकासाहेब पोकळे,रामदास पोकळे,शहाजी पोकळे,राजेंद्र पोकळे,बाळू पाखरे,दीपक पोकळे,दादासाहेब खंडागळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बेलगावच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी युवा नेते सागर धस यांनी दिले.माजी प्राचार्य ढोबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या