Ticker

6/recent/ticker-posts

स्नेह आणि आपुलकीचा लेखन प्रवास...

आष्टी (प्रतिनिधी) अविरत,सातत्यपूर्ण आणि निरंतर...आपल्या वैचारिक प्रगल्भ लेखणीतून समाज विश्वातील विविध घडामोडींना अत्यंत सकारात्मकतेने घेऊन.. शब्दबद्ध करत अनेक दशकांचा प्रवास यशस्वी रीतीने करताना स्नेह,आपुलकी,प्रेम,जिव्हाळा अस्था, माया या सद्गुणांच्या माध्यमातून लेखन प्रवास करणार्या दोन मित्रांचा हास्यकल्लोळातील प्रेमपुर्वक आलिंगन देणारी प्रतिमा संस्मरणीय ठरली आहे.उत्तम बोडखे आणि प्रवीण पोकळे! पत्रकारिता क्षेत्रातील अविरत प्रवास करणारे दोन अविभाज्य घटक.बीड जिल्ह्याच्या आष्टीतील पत्रकार बांधवांच्या मालेतील सुंदर पुष्प.वैविध्यपूर्ण वैचारिक वाटचालीत अत्यंत सकारात्मकतेने हसतमुख चेहऱ्याने पुढे जात मानवी जीवनातला प्रमाणिक हेतू साध्य करत विविध जात धर्म पक्ष संघटना आणि या सर्वातून पुढे जाताना एक चांगुलपणाचा भाव घेत पुढे जाणारी ही गोड स्वभावाची जोड गोळी ऐक्य, बंधुत्व आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विविध सण उत्सवाच्या माध्यमातून विविध जाती धर्म ग्रंथांचे लोक एकत्र येत माणूस पण हे मूल्य जपतात.शनिवारी रमजान ईद च्या माध्यमातून विविध मुस्लिम बांधवांनी पत्रकार बांधवांना निमंत्रित करून शुभेच्छा आणि आशीर्वादातून
जीवनाचा सुंदर प्रवास करण्यासाठी स्नेहपूर्वक एकत्र आणण्याचा योग आला. या निमित्ताने या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तमराव बोडखे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भगवी शाल देऊन पत्रकार प्रवीण पोकळे यांनी सत्कार करून एकमेकांना स्नेहपूर्वक आलिंगन देत हास्यमुद्रेने फोटोग्राफरला पोज दिली.फोटोग्राफरने ही तितक्याच कलात्मकतेने कॅमेर्यात ती जबाबदारीने कैद करून प्रसारित केली.अनेकांनी लाईक करून कौतुक केले. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या