आष्टी (प्रतिनिधी)
संस्काराला मुकलेल्या आणि भाकरीला भुकेलेल्या गरीब लोकांचे
कर्मवीर भाऊराव पाटील दिशादर्शक ठरले. गरिबांच्या झोपडीत 'ज्ञानदीप' कसा लागेल?
याचा ध्यास त्यांनी घेतला होता.हीच प्रेरणा प्रमाण मानून आपल्या अत्यंत सामान्य
अवस्थेमधून पुढे जात स्वतःसह असंख्य खेड्यापाड्यातील तळागाळातल्या माणसाला
शिक्षणातून दिशा देणारे गुरुजी म्हणून विठ्ठल जायभाये सरांकडे पाहिले जाते.असे
म्हणतात,मानवाच्या स्वभावात'त्याग'हा सद्गुन असण्याची गरज असते. सामाजिक बांधिलकी
जोपासून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असू तर आदर्श प्रस्थापित होऊ शकतो! या
मूल्यांवर विश्वास ठेवून सदैव गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हृदयात आपले
स्थान निर्माण करण्यासाठी.गणिताला सोपे करून सर्वच विषय आवडीचे करणारा.एक गुन्निजण
शिक्षक म्हणून विठ्ठल जायभाये यांच्या नावाची बीड जिल्ह्यात एक वेगळी क्रेझ आहे.
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलावात असतो.केवळ गुणवत्ता नव्हे;तर सामाजिक
दायित्वाची ही गरज असते.याची सदैव जाणीव विठ्ठल जायभाये यांनी ठेवली.बीड
जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील काकडहीरा या अत्यंत छोट्या खेड्यामध्ये विठ्ठल
लहानाचे मोठे होताना जिल्हापरिषदेच्या शाळेतून पुढे आले. घरची परिस्थिती ऊसतोड
कामगार असल्याने चिंता होतीच परंतु त्यावर मात करून नवे क्षितिज गाठण्याची
त्यांच्या त ऊर्जा सुद्धा होती.प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणानंतर
त्यांनी डीएड करून शिक्षकाची नोकरी घेतली.स्पर्धा परीक्षातून यश आजमावण्याच्या
प्रयत्नात असतानाच गरिबीमुळे त्यांना संसाराचा गाडा पुढे नेणे सुद्धा क्रम प्राप्त
होते.आणि म्हणूनच त्यांनी चरितार्थ भागवून अध्यापनाच्या कार्याला मनापासून सुरुवात
केली.दुःखाने माणसाच्या मनाचा तोल जातो असे वि.स.खांडेकर म्हणतात.त्या स्तव त्यांनी
मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्या श्रेष्ठ असतो हे जाणीव ठेवून शिक्षण या
पवित्र क्षेत्राला कायम पवित्र ठेवण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलला डोक्यावरचे
ओझे उतरवता येईल पण मनावरचे ओझे उतरता येत नाही' ही जाणीव ठेवत त्यांनी प्रत्येक
विद्यार्थ्यांना मदत करण्याचा वसा घेतला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती
शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अनेक गरीब होतकरू मुला-मुलींना स्वतःच्या
खिशातून आर्थिक मदत केल्याचे वास्तव आहे.आयुष्यात नवचैतन्याचे रंग भरावे सुखाचे
अभिनंदन व्हावे..ही भूमिका त्यांनी मांडली. बीड येथील जिल्हा परिषदेच्या ज्ञान
मंदिरात त्यांनी अध्यापनाचे पवित्र कार्य करून इतिहास रचला आहे.संत जनाबाईंनी
अभंगातून ज्याप्रमाणे अहंकाराची होळी करण्याचा संदेश दिला, त्याप्रमाणे शिक्षणातून
समता बंधुत्व आणि ऐक्य सर्वधर्म समभावाची मूल्य जतन करण्यासाठी त्यांनी संस्काराची
पेरणी केली.आज त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर नावारूपाला आले आहेत.स्वतः
त्यांचा एक मुलगा एमबीबीएस;तर दुसरा आयआयटीच्या मार्गाने आहे. त्यांच्या सुविद्य
पत्नी गीतांजलीताई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.नॉलेज प्लांट च्या
माध्यमातून त्यांनी निर्माण केलेले रोपटे विशाल वृक्षाकडे वाटचाल करीत आहे.आज अशा
या उपक्रमशील संवेदनशील चैतन्यदायी पवित्र मनाच्या या दांपत्यासह गणित विषयाचे
तज्ञ,आदर्श शिक्षक,गुणवंत व्यक्तिमत्व विठ्ठल जायभाये यांना अभिष्टचिंतन दिनाच्या
निमित्ताने शुभेच्छा..!
चौकट
---------
स्फूर्ती,ऊर्जा निर्माण करणारा कृतीशील
अध्यापक!
---------------
अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत
शिक्षक घेऊन राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले यांच्या
विचारांना प्रेरणा मानून अत्यंत खडतर वाटचाल करत ध्येयवादी विचाराने शिक्षण
क्षेत्रात पदार्पण करून गरीब गरजू युवक युवतींना मार्गदर्शन करत कर्तव्य भावना
जोपासणारे,आर्थिक पाठबळ देत आधार देणारे शिक्षक म्हणून विठ्ठल जायभाये गुरुजी
यांच्याकडे पाहता येईल असे निवेदक प्रा.बिभिषण चाटे म्हणाले.
------------------------
0 टिप्पण्या