आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.दि.२४ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या २०२६ च्या निकालात शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामीण भागात गुणवत्तेचा झरा
अति ग्रामीण भागात १९५६ पासून ज्ञानदानाचे अखंड कार्य करणाऱ्या खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयाने आपला शैक्षणिक दर्जा नेहमीच उंचावलेला ठेवला आहे. आर्थिक दुर्बल गटातील इयत्ता आठवीच्या मुला-मुलींसाठी एनएमएमएस (NMMS) ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची व स्पर्धात्मक मानली जाते.या कठीण परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या अफाट मेहनतीची आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देते.या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
या राज्यस्तरीय परीक्षेत शाळेतील सार्थक रामदास घोडे,प्रविण परमेश्वर काकडे,अल्फाज लतीफ शेख,तनुजा हनुमान गाडे, कल्याणी बाळासाहेब थोरवे आणि वैष्णवी भारत उदमले या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे अथक परिश्रम आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आर.यु.बोडखे,जे.आर. काकडे,जे.यु.वाळके,पी.के.नरवडे,ए.जी.भालेराव आणि अशोक बाळासाहेब थोरवे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव हनुमंतराव थोरवे,युवा नेते धैर्यशील थोरवे आणि विद्यालयाचे प्राचार्य रविकांत सुंबरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.तसेच,

शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक, खुंटेफळचे सरपंच,उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या