Ticker

6/recent/ticker-posts

सियाज् प्रिस्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न ......... प्रा.इंजि.प्रियंका सचिन विधाते यांचे कौतुकास्पद कार्य ...... सौ.दमयंती धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) काल सियाज् प्रिस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यावेळी अध्यक्षस्थानी सौ.दमयंती धोंडे प्रमुख पाहुणे भाऊसाहेब भिसे,परशुराम विधाते,भाऊसाहेब नवले,जालिंदर मुळे,डॉ.शिवानी बोडखे,सौ.बबीता बोडखे,सौ.मंजुश्री कुलकर्णी सौ.मंगल शिंदे,सौ.विद्या ढेरे, सौ.तेजश्री धंगेकर, सौ स्वप्नाली बोडखे, सौ.स्नेहा मुळे उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक पुरस्कार वितरण केले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला होता ज्यामध्ये लिंबू चमचा,धावणे,तीन पायाची शर्यत, संगीत खुर्ची, पोत्यामधील उड्या, हस्ताक्षर स्पर्धा , वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी याचे वितरण करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करताना उत्कृष्ट प्रकारे नृत्य सादर केले.अभिनय केला व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अध्यक्षीय भाषणावेळी सौ.दमयंती धोंडे म्हणाल्या की, प्रियंका व सचिन विधाते यांनी सुरू केलेल्या सियाज् प्रि-स्कूलच्या फुलाचा आता गुच्छ झालेला आहे व त्यांची अशीच प्रगती होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.महिला प्रतिनिधित्व असलेली ही शाळा उत्कृष्ट काम करत आहे,प्रियंका विधाते यांच्या नियोजनात शाळेचे काम उत्कृष्ट होत आहे.ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन मुलांना प्रयोगशील शिक्षण दिले जाते त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात मदत होते. प्रमुख पाहुणे भाऊसाहेब भिसे त्यांचे मनोगत व्यक्त करताना लहान मुलांना शिकवणे खूप अवघड आहे. या लहान चिमुकल्यांना उत्कृष्ट प्रकारे नृत्य करायला लावणे म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि ही कसरत सियाज् प्रिस्कूल खूप तळमळीने पूर्ण करत आहे.याचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक दिगंबर जोगदंड, दत्ता बोडखे,सुरज माने सुरज मुळे,इंजि. संदीप घोलप,सौ. बबीताताई बोडखे यांनी मुलांचे कौतुक करताना बक्षीस प्रदान केले. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सौ.रेश्मा भवर,सौ. रूपाली धोंडे,सौ मोनाली शिंदे,सौ. माया लोखंडे सौ. स्वाती वाघ,कु. आरती द्वारके,सौ. जागृती धोंडे,सौ. शीतल निकाळजे, गहिनीनाथ शिंदे या पडद्यामागे कलाकारांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाची सांगतात राष्ट्रगीताने होऊन आभार प्रदर्शन शाळेचे संचालक प्रा. इंजि.सचिन विधाते यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या