
आष्टी (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाने राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र आणले.उद्घाटनानंतर विविध तांत्रिक सत्रे,मार्गदर्शन कार्यशाळा,कृषी तज्ञांचे व्याख्यान,सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली.शेतकऱ्याचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी,प्रशासन अधिकारी,
प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यशस्वी झाले आहे असे प्रतिपादन महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र धोंडे यांनी केले.
आष्टी येथे दि.१९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा आज समारोप करण्यात आला.पाच दिवस चाललेल्या या भव्य कृषी प्रदर्शनाने केवळ आष्टी तालुक्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक,महिला बचत गट,कृषी तज्ज्ञ,विद्यार्थी व नागरिकांना एकत्र आणले.संयोजकांच्या माहितीनुसार,पाच दिवसांत २ लाख ५० हजारांहून अधिक शेतकरी,नागरिक,विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अभय धोंडे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून व राज्य गीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम आरसूळ यांनी केले. संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.शिवदास विधाते यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची,विविध तांत्रिक आणि स्टॉल व्यवस्थापनाची माहिती दिली.
मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती या समारोप प्रसंगी महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र धोंडे,आरपीआयचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,पंचायत समिती पाटोदा माजी सभापती अनिल जायभाय,माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे, माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण,संभाजी जगताप,हरिभाऊ जंजिरे,कुंडलिक आस्वर,व्यवस्थापन अजय वाबळे,युवराज खटके,जिजाऊ मसाले उद्योगाचे प्रमुख बाबू गर्जे, संस्थेचे प्रशासनन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,प्रा.सागर वाघुले,प्रा.संदीप नन्नवरे,इंजि.पी.बी. बोडखे,नवीन कासवा,अमोल भंडारी,गौतम आजबे,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ,सर्व प्राध्यापक,कर्मचारीवृंद,विद्यार्थी,पत्रकार बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सतीशआबा शिंदे म्हणाले की, मोठ्या शहरांतील कृषी प्रदर्शनांना तिकीट घेऊन प्रवेश करावा लागतो. मात्र धोंडेसाहेबांच्या संकल्पनेतून आष्टीत शेतकऱ्यांसाठी विनामूल्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले,ही कौतुकाची बाब आहे.शेतकऱ्यांना लागणारी आधुनिक कृषी अवजारे,कीड व्यवस्थापन,बीज प्रक्रिया,
आंतरमशागत तंत्रज्ञान,सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे तसेच अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे शेत निरीक्षण यांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात आली.महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी आणखी व्यापक नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी आपल्या भाषणात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा गौरव करत आष्टी मतदारसंघ कोरडवाहू असूनही शिक्षण व कृषी क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याचे सांगितले.
प्रदर्शना दरम्यान लाखो रुपयांच्या मसाल्यांची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिक उत्पादकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे समाधान व्यक्त केले.जलव्यवस्थापन,
आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान,जलजीवन मिशन यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापिका सुजाता बनकर यांनी तर पोपट काळे यांनी आभार मानले.
--------------
0 टिप्पण्या