Ticker

6/recent/ticker-posts

धकाधकीच्या जीवनात मनाला उभारी देणारी 'हुरडा पार्टी'; आष्टीत स्नेहीजनांच्या सोबतीने रंगली अस्सल ग्रामीण मेजवानी! जीवनातील आनंद द्विगुणित करण्याचे हुरडा पार्टी हे सर्वोत्तम ठिकाण ----- ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे

आष्टी (प्रतिनिधी) दैनंदिन धावपळ,ताणतणाव आणि धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विश्रांती घेत, निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या माणसांसोबत घालवलेले क्षण हेच खऱ्या अर्थाने मानसिक शांततेचा ठेवा ठरतात.असाच एक अविस्मरणीय कौटुंबिक आणि स्नेहबंधांचा मेळावा आष्टी तालुक्यातील एका शेतात 'हुरडा पार्टी'च्या निमित्ताने पाहायला मिळाला. बाल-गोपाळांचा उत्साह आणि स्नेहीजनांच्या गप्पागोष्टींनी ही हुरडा पार्टी विशेष रंगली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तम बोडखे यांनी हुरडा पार्टीचे महत्त्व विशद केले.ते म्हणाले, आजकाल शहरांमध्ये हुरडा पार्टीला व्यावसायिक स्वरूप आले आहे, मात्र ग्रामीण भागातील खेड्यात,झाडाखाली बसून अस्सल गावरान चवीचा हुरडा खाण्यात जो आनंद आहे,तो कशातच नाही.हे केवळ खाण्याचे ठिकाण नसून विचारांच्या आदान-प्रदानाचे आणि नाती अधिक घट्ट करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.अशा उपक्रमांमुळे शारीरिक आणि मानसिक शांतता लाभते.या हुरडा पार्टीत कोवळा हुरडा,सोबतीला तीळ-गुळाची रेवडी आणि विविध प्रकारच्या खमंग चटण्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यात आला. शेतातील मोकळ्या हवेत रंगलेल्या या मैफलीत केवळ ज्येष्ठच नव्हे, तर नातवंडे आणि मुलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.निसर्गाच्या कुशीत रंगलेल्या या गप्पांमुळे सर्वांच्याच जीवनातील आनंद द्विगुणित झाला.या कौटुंबिक स्नेह मेळाव्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्यासह मुख्याध्यापक संतोष नवले,गोरक्ष लाड सर,शिक्षिका सौ.बबीताताई बोडखे,डॉ.शिवानी बोडखे,पंजाब बांगर,सुनील कारंजकर,संतोष झगडे,बाळासाहेब भोपळे, रामदास सांगळे,सौ.अश्विनी बोडखे,सौ.स्वप्नाली बोडखे,कु.वर्षा सांगळे या सर्वांसह रियांश,आदीराज हे नातवंडे आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रत्येकाने दैनंदिन ताणतणाव विसरून या गावगाड्याच्या पारंपरिक मेजवानीचा आनंद घेतला.निसर्ग, नाती आणि नवनवीन विचारांची गुंफण या हुरडा पार्टीच्या माध्यमातून पाहायला मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या