आष्टी (प्रतिनिधी)
प्रारब्ध हे भोगावेच लागते,प्रपंचात पक्षाप्रमाणे असले पाहिजे.संसारीक माणसाच्या जीवनात १३ गोष्टी दुर्लभ आहेत. योगायोगाने मनुष्यजन्म मिळतो.धर्मशास्त्रात मनुष्यजन्म हा दुर्लभ सांगितलेला आहे.माणसाच्या जीवनात अडचणी येत असतात त्या अडचणींना सुद्धा ईस्ट बनवले पाहिजे.आपत्तीला ईस्ट बनवणारेच खरे माणसं असतात.माणसाच्या देहाला अनेक विकार आहेत.त्यापैकी सहा विकार प्रमुख असतात.सहा विकार घेऊनच माणूस जन्माला येतो.फुकट भेटलेल्या गोष्टीचे महत्त्व नसते,त्याची किंमत नसते,कष्टाने कमावलेल्या गोष्टीची किंमत फार वेगळे असते.मनुष्याने संसारी असावेच पण त्याहीपेक्षा संस्कारी अधिक असावे असे सांगत थोर स्वतंत्र सेनानी वै.साहेबराव थोरवेदादा हे १२२ वर्ष जगले.कलियुगात १२२ वर्ष जगणे हे कठीण आहे.महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदाप्रमाणे
जीवन जगून १२२ वर्षाचे आयुष्य लाभलेले थोरवेदादा हे एकमेव व्यक्ती असावेत असे सांगत थोरवे दादांचा वारसा त्यांचे सुपुत्र अॅडव्होकेट हनुमंत थोरवे आणि नातू युवा नेते धैर्यशील थोरवे हे सक्षमपणे चालवत आहेत असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले.
आष्टी तालुक्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी वै.साहेबराव थोरवेदादा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्त सोलापूरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह,भागवत मूलसंहिता वाचन पारायण,श्रीमद्भागवत गीता पारायण होम-हवन यज्ञ अशा धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम व सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.
यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कराळे,ह.भ.प.राऊतदादा महाराज,रवींद्र महाराज सुडके, कोर्टीकर महाराज,
बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार,देविदास
आबा धस,राजेंद्र धोंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,महेश आजबे,बँक मॅनेजर राकेश शाही,विठ्ठल बनसोडे,डॉ.शिवाजी राऊत,झांबरे महाराज,अण्णासाहेब चौधरी,सुनील नाथ, राजाभाऊ दरेकर,उद्धव दरेकर,निकुंबे,भानुदास बोडखे आदि सामाजिक राजकीय,धार्मिक,क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना
ह.भ.प.पाचपोर महाराज म्हणाले की जीवन हे सुंदर आहे परंतु हे जगत असताना अध्यात्माचा सुगंध सोबती असावा लागतो.सत्य,सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून मनुष्य आनंदी जीवन जगू शकतो असे सांगत मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्कारी अधिक असले पाहिजे असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांनी केले. यावेळी महाराज संतश्रेष्ठ जगद्गुरु वंदनिय संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण करताना त्यांनी विविध दृष्टांत देत उपस्थित भाविक भक्तांना खेळवून ठेवले.स्वातंत्र्य सेनानी वै.थोरवे दादा यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह.भ.प.संजय महाराज पाचपोर पुढे म्हणाले की,
स्वातंत्र्य सेनानी वै.साहेबराव थोरवे दादा यांनी आयुष्यभर राष्ट्रभक्ती, सामाजिक कार्य, साधी व संयमी जीवनशैली आणि अध्यात्मिक विचारांचा पुरस्कार केला.त्यांच्या या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नव्या पिढीसमोर त्यांचा प्रेरणादायी वारसा मांडण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे.समाजात एकात्मता,सद्भावना व संस्कार वृद्धिंगत व्हावेत हा या सप्ताहामागील मुख्य उद्देश असल्याचेही पाचपोर महाराजांनी सांगितले.संत महतांनी मानवी जीवनाला फार मोठा भक्तीचा महिमा दिला आहे त्यांनी सांगितलेल्या विचार आणि कार्यावर चालल्यास मनुष्याची फार मोठी यश प्राप्ती होऊ शकेल. सद्यस्थितीवर भाष्य करताना महाराजांनी अनेक दृष्टांत दिली गरीबांची झोप श्रीमंत असते तर श्रीमंतांची झोप गरीबी असते असे सांगत त्यांनी आजही श्रीमंत घरची मुले आई वडिलांना सांभाळ करायला तयार नाहीत,सेवा करीत नाहीत हे वास्तव अधोरेखित करून मनुष्याने संसारी जरूर असावे पण त्याहीपेक्षा संस्काराची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.उपस्थित रसिक प्रेक्षक आणि भाविक भक्तांनी त्यांच्या वास्तवावरील केलेल्या वाणीला प्रतिसाद दिला.समाजातील आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असलेल्या व्यक्तींनी आपल्या घराची दरवाजे सतत उघडी ठेवली पाहिजेत या दरवाजातून गोरगरी व गरजू समाजातील व्यक्तींना सढळ हाताने मदत करावी अशी वृत्ती ठेवली पाहिजे.समाजातील व्यक्तींनी अध्यात्म अथवा परमार्थ नाही केला तरी चालेल परंतु समाजामध्ये राहत असल्यामुळे समाजाला गरज लागेल त्यावेळी समाजासाठी उपयोगी पडण्याची गरज असते समाजावरहीत व्यक्तीला काहीच किंमत नसते.गरजू व्यक्तींना मदत करणे ही सर्वात मोठी नैतिकता असून श्रीमंत माणसांनी आपल्याकडील पैशाचा उपयोग गरजू आणि दीनदुबळ्या लोकांसाठी मदतीसाठी केला पाहिजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये संस्कृती रक्षणाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदू धर्मातील नागरिकांनी आपल्या उत्पन्नातील किमान १० टक्के रक्कम ही देश देव आणि धर्म यासाठी समाजाला दान केली पाहिजे.हे दान देखील कर्तव्य म्हणून केले पाहिजे केवळ नावासाठी दानधर्म करू नये असे आवाहन केले.
समाजातील कीर्तनकार,प्रबोधनकार, राजकीय नेते आणि वैद्यकीय व्यावसायिक यांनी कधीही खोटे बोलू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असते.
प्रयत्न करूनही होत असेल तर ते प्रारब्धाने होत असते.कोणाचं कसं प्रारब्ध असेल ते सांगता येत नाही.
ज्या घरी आदर नाही,प्रेम नाही,त्या घरी कोणीच जाऊ नये.लाभाशिवाय प्रेम करणारे आई वडील असतात.आई वडिलांची सेवा करा तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोणत्याही देवाला तीर्थ क्षेत्राला जायची गरज नाही.
जो आई वडिलांना सांभाळतो आहे त्यांची मुले देखील त्यांची सेवा चांगली करतील ते सहकार क्षेत्रात एक नंबर असलेला माणूस राजकीय क्षेत्रात सर्व आमदार आणि प्रत्येक घटकांची संपर्क असलेले थोरवेदादा होते.सर्व पक्षाशी संबंध असलेलं हे व्यक्तिमत्त्व आहे.या एका छोट्याश्या वाडीतून येत दादांनी तालुक्यातीलच नव्हे जिल्ह्यात राजकीय,सामाजिक क्षेत्रात नावलौकिक निर्माण केला होता असेही शेवटी रामायणाचार्य ह.भ.प.पाचपोर महाराजांनी सांगितले.
यावेळी माजी आ.

साहेबराव दरेकर,विजय गोल्हार,डॉ.शिवाजी राऊत,शंकर देशमुख,उद्धव दरेकर,अण्णासाहेब चौधरी,राऊतदादा महाराज,महेश आजबे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.उपस्थितांचे हनुमंत थोरवे यांनी आभार मानले.
-----------------
0 टिप्पण्या