Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनावरील 'जरब' अन् कार्यतत्पर व धाडशी नेता हरपला; लोकनेत्याच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकुल ----- माजी आ.भीमराव धोंडे यांची भावूक श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक धडाडीचे,कार्यतत्पर आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्याची मोठी हानी झाली आहे.या लोकनेत्याच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेतून आणि राजकीय वर्तुळातून मोठी शोककळा पसरली आहे. जनतेतील एक हजरजवाबी आणि धाडसी नेता हरपला प्रशासनावरील 'जरब' अन् कार्यतत्पर व धाडशी नेता हरपला; लोकनेत्याच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकुल अशा शब्दांत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपली भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला शोक संदेश देताना ते पुढे म्हणाले की, प्रशासनावर 'धाक' असणारे कार्यक्षम नेतृत्व होते. अजितदादा यांच्या
निधनाची बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.आजित दादांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की,असे नेतृत्व होणे आता कठीण आहे.पहाटेच उठून कामाला लागणारा हा नेता होता. कामाची प्रचंड उरक आणि कार्यतत्परता हे त्यांचे वैशिष्ट्य होते.विशेष म्हणजे प्रशासनावर त्यांची पकड इतकी जबरदस्त होती की, बड्या अधिकाऱ्यांवरही त्यांचा वचक आणि धाक असायचा. लोकांची कामे करून घेताना त्यांनी कधीही वेळ-काळ पाहिला नाही.आता महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाल.​केवळ आक्रमकपणाच नव्हे तर हजर जवाबीपणा आणि कोणत्याही संकटात धावून जाण्याचे धाडस यामुळे हे नेतृत्व महाराष्ट्रभर लोकप्रिय होते.अजित दादाच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक धडाडीचा आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता काळाने हिरावून नेला आहे.मी अजित दादांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडेच मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश केलेला आहे ते आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री तर होतेच आणि आमचा मोठा आधारही होता असेही भीमराव धोंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केले. ----------------- ​

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या