

आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ.विलासराव सोनवणे यांचे नेतृत्वाखाली सहकार,समृद्धी आणि सचोटी याचा समन्वय करून ३५ वर्ष उत्तम काम करणाऱ्या आष्टी नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे माजी आमदार निवृतीराव उगले सहकारी पतसंस्था असे नामकरण करण्यात आले आहे
आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ. निवृत्ती विठ्ठलराव उगले यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षांपूर्वी आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली.
पतसंस्थेचे चेअरमन
डॉ.विलासराव सोनवणे आणि त्यांच्या संचालकांनी सहकाराचे सर्व नियम पाळून सभासद, छोटे व्यावसायिक व्यापारी यांचा समन्वय करत संस्थेचा अतिशय उत्तम कारभार केला आहे.माजी आ. निवृत्ती विठ्ठलराव उगले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याची स्मृती राहावी,यासाठी आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळामध्ये या पतसंस्थेस माजी आ. निवृत्तीराव उगले त्यांचे नाव देण्यात यावे असा निर्णय झाला आणि दि.१ जानेवारी २०२६ पासून आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी आ. निवृत्ती विठ्ठलराव उगले सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी असे या संस्थेचे नामकरण करण्यात आले आहे.याविषयी पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे चेअरमन डॉ.विलासराव सोनवणे यांनी घोषित केले.याप्रसंगी स्व. माजी आमदार निवृत्ती विठ्ठलराव उगले यांचे समवेत काम केलेले माजी आ. साहेबराव दरेकर यांची उपस्थिती होती. त्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी आ. निवृत्तीराव उगले यांच्याविषयी आठवणी जागवताना त्यांनी माजी आ. निवृत्तीराव उगले यांनी विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यपदी काम करताना उपस्थित केलेल्या लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न याबाबत विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी केलेली आढळून येते. मराठवाड्याच्या विकासाबाबत त्यांनी अनेक विषय सभागृहामध्ये मांडले आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे.महाराष्ट्र विधानमंडळ कामकाजामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा वृत्तांत ग्रंथालयात पाहावयास मिळतो त्यामुळे या पतसंस्थेस माजी आ.निवृत्तीराव उगले यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे असे प्रतिपादन केले. यावेळी माजी आ.निवृत्तीराव उगले यांच्या कन्या सौ.निर्मलाताई विलासराव सोनवणे यांच्या आणि डॉ.सुजयदादा सोनवणे, संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत कटारिया, संचालक नकुल गुरव, आणि माजी आ.निवृत्तीराव उगले यांच्या निधनानंतर त्यांचे जागी संचालकपदी निवड झालेले श्री जयचंद चोपडा उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अमोल जगताप यांनी केले. पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकासाहेब पोकळे आणि प्रशांत पोकळे व त्यांच्या सहकार्याने या संपूर्ण पत्रकार परिषदेचे नियोजन केले होते.
0 टिप्पण्या