
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द या खेडेगावचे रहिवासी सध्या
शेवगाव येथे स्थायिक झालेले पोपटराव पंढरीनाथ घुले गुरूजी यांची कन्या सुप्रिया ही
वडील आजारी असताना जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जिवावर कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्र
राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मुंबई उच्च न्यायालयात पी.ए. क्लास वन अधिकारी म्हणून
निवड झाली आहे. ती सामान्य कुटुंबातील असून सातत्याने प्रयत्न करत हे यश संपादन
केल्याबद्दल आष्टी तालुका व शेवगाव तालुक्याचा मान उंचावला आहे. सुप्रिया घुले या
छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय गंगापूर येथे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत
होत्या. आरोग्य विभाग मंत्रालय आणि महत्वाच्या विभागात त्यांची निवड झाली होती.
मात्र क्लास वन पद मिळवण्याच्या ध्येयाने त्यांचे प्रयत्न सुरू ठेवून अखेर ध्येय
गाठले सुप्रियाच्या या यशाने कारखेल खुर्द,आष्टी तालुक्यातील व शेवगाव तालुक्यातील
नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन होत आहे. लवकरच तिचा भव्य सत्कार त्यांचे जन्मगाव
कारखेल खुर्द येथे होणार आहे अशी माहिती कारखेलचे सरपंच रघुनाथ घुले, उपसरपंच
लक्ष्मण घुले,नवनाथ पाटील घुले,गहिनीनाथ घुले, राजू घुले,कैलास घुले,बाबासाहेब
गव्हाणे,अशोक वनवे,शहादेव सांगळे,बाळाजी घुले,नामदेव दुकानदार,शिवाजी घुगे,परमेश्वर
घुले, माजी सरपंच विश्वनाथ चौधरी, लक्ष्मण पाटील घुले, सचिन घुले,मदन चौधरी,आजिनाथ
बर्डे,संजय चौधरी, सुदर्शन घुले,गोविंद घुले,प्रा.छगन घुले, रामभाऊ घुले,मेजर कुशल
घुले,डॉ. संदिप बांगर,प्रदीप बांगर,भरत चौधरी, आजिनाथ चौधरी, शिवाजी खुडे, देविदास
घुले, राजेंद्र घुले, प्रकाश घुले, जनार्दन घुले,श्रीराम खुडे,खुडे गुरूजी आदिंनी
शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या