Ticker

6/recent/ticker-posts

सुरेशराव आपण आमदार असल्यासारखे बोलावे,वागावे, आम्हांला फुगेवाले समजु नका, --- माजी आ.भीमराव धोंडे यांचे आ.धस यांना प्रत्युत्तर

आष्टी(प्रतिनिधी) सुरेशराव धस साहेब अहो तुम्हांला बीड जि.प.चे उपाध्यक्षपद कुणामुळे मिळाले ? विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्या जिंदाबादच्या (वय विसरुन) घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी तुम्ही निवडून आलात,राज्यमंत्री झालात.हे सोयीस्कर विसरु नका. उपकाराची परतफेड अपकारने करण्याची तुमची सवय आहे. महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स दि.८ एप्रिल २०२४ म्हणजे सोळा महिन्यापुर्वी रद्द झालेले आहे. आमदार महोदय त्यावेळेस आमचे संचालक मंडळ नव्हते.ते संचालक मंडळ तुम्हीच जाॕईंट डायरेक्टरला सांगुन रद्द केले होते.आम्ही शासनाकडे अपील केले होते. दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी आमचे संचालक मंडळ पुर्नस्थापीत झाले.महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने १० ते २० वर्षापासून बंद आहेत त्यांचे लायसन्स रद्द झालेले नाहीत.आमच्या सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स कुणी व कसे रद्द केले हे ऊसउत्पादक शेतकरी,मतदार संघातील जनतेला माहित आहे. यशवंत (थेऊर),शंकर (यवतमाळ), शिवशक्ती,सुधाकर नाईक सहकारी साखर अशी अनेक कारखान्याचे उदा. आहेत.सुरेशराव आपण आमदार असल्यासारखे बोलावे,वागावे. आम्हांला फुगेवाले समजु नका,आम्ही मतदार संघातीलच आहोत असे माजी आ.भीमराव धोंडे यांनी आ.धस यांना आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याचे लायसन्स प्रकरणी सध्या आजी - माजी आमदारात कलगीतुरा रंगला आहे.माजी आ.धोंडे पुढे म्हणाले की, आ.सुरेश धस यांना आपण २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मदत केल्यामुळे ते मंत्रिमंडळात दिसले.हे त्यांनी विसरु नये.मी त्यांना ब-याचवेळा राजकीय मदत केलेली आहे.त्यांनी मला एकदाही मदत केली नाही. ऊलट माझ्या विरोधातील उमेदवारला मते देऊन माझा पराभव केला आहे. आमदारांनी आमदारासारखे वागावे.या आ.धस यांना उपकाराची परतफेड अपकाराने करण्याची सवय असल्याचा आरोप माजी आ.भीमराव धोंडे यांनी आ.सुरेश धस यांच्यावर केला आहे. आष्टीचे आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आष्टी येथील आनंद भवन येथे आज रविवार दि.२ नोव्हेंबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, आमच्या कारखान्याचे लायसन्स हे दि.८ एप्रिल २०२४ रोजी परंतु पुन्हा संचालक मंडळ २५ फेब्रुवारी २०२५ स्थापन झाले आहे. महाराष्ट्रामध्ये १० ते २० वर्षांपासून बंद असूनही त्यांचे परवाना रद्द झाले नाहीत. जे नियमानुसार कामगारांचे देणे आहे ते देण्यास आमचे संचालक मंडळ बांधील आहे. उलट आमदार महोदयांनी २००७ ते २००८ हे दोन वर्ष कारखाना चालविला त्यांचे कामगारांचा पीएफ फंड भरला नाही,विशेष म्हणजे आ.धस यांनी सुपरटेक कंपनीचे थकविलेले ३ कोटी २८ लाख रुपये भाडे आमच्या संचालक मंडळाने भरले आहे.आ.धस यांनी आम्ही हे करू ते करु अशा धमक्या देऊ नयेत. आम्हीही मतदार संघातीलच आहोत.असे बोलणे आमदारांना शोभत नाही.त्यामुळे आमदारांनी आमदारासारखे वागावे असाही सल्ला ही धोंडे यांनी दिला.महेश सहकारी साखर कारखाना विक्रीला निघाला होता.शेतकऱ्यांचा कारखाना होता म्हणून आपण तो घेतला नाही.जुन्या नेत्यांनी खुप कष्टाने हा सहकारी साखर कारखाना उभा केला होता.ज्यांनी कारखाना सुरु केला ते आता हयात नाहीत.आपण निवडणुकीत तो कारखाना जिंकला ऊस क्षेत्र वाढले आहे.इतर पिके परवडत नाहीत. त्यामुळे परवाना मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरांना भेटलो आहे.खाजगी कारखान्यासाठी हा सहकारी साखर कारखाना बंद पाडू नका.महेशचे लायसन्स तर मिळणारच आहे. सरकार सहकारी तत्वावरचा कारखाना मोडीत काढणार नाही.१५ दिवसात महेशला लायसन्स मिळाले नाही तर आम्ही पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहोत. मला दोन चार पक्षात गेलो फिरलो म्हणता... तुमचा राजकीय प्रवासही जनतेला माहितच आहे. राजकीय कार्यकर्ता आपआपल्या सोयीने राजकारण करतो.पक्ष निवडतो.. तुम्ही राष्ट्रवादीतुन भाजपात,भाजपामधुन राष्ट्रवादीत गेलेले आहात..हे जनता अजुन विसरली नाही.मी लोकशाही पध्दतीने वागणारा कार्यकर्ता आहे.धाकदडपशाही करुन राजकारण करणारा नाही. आमदारसाहेब आम्हांला कारखान्याबाबत त्रास देण्यापेक्षा तुम्ही कराराने महेश कारखाना चालवयला घ्या.. आम्ही कराराने हा साखर कारखाना तुम्हांला चालवण्यास देण्यास तयार आहोत.महेश साखर कारखान्याचे कामगारांच्या पगाराबाबत बोलताना धोंडे म्हणाले की, आमच्या बॕलेन्ससीट प्रमाणे २ कोटी ३४ लाख रु.कामगारांचे पगार देणे बाकी आहे. कारखाना सुरु झाला तर टप्प्याटप्प्याने पगार दिले जातील. कारखान्याच्या जमीनीवर कामगारांच बोजा टाकल्याची पध्दती चुकीची आहे.ती नोंद रद्द करण्याचे काम कारखान्याचे संचालक मंडळ करणार आहे असेही माजी आ.धोंडे यांनी शेवटी सांगीतले. कॕन्सर हाॕस्पीटलच्या उभारणीबाबत बोलताना धोंडे म्हणाले की, या हाॕस्पीटलच्या उभारणीसाठी संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी चांगल्या व मदतीच्या भावनेतुन आर्थिक मदत केली असेल तर ते तुम्हांला खुपण्याची गरज नाही.ऊलट तुम्ही या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पुढे होऊन तुमच्या इमदर फंडातुन ५० लाख रु मदत द्यावी. मी आमदार असताना तुम्ही राज्यस्तरीय सामने भरविले होते त्या कामास मी आमदार फंडातुन निधी दिलेला आहे. सामाजिक काम व गोरगरीब कॕन्सर पीडीतांची सोय होणार आहे म्हणून आ.धससाहेब आपण शासनाच्या विविधा योजनातुन २५ कोटी रु चा निधी या हाॕस्पीटलसाठी मिळवुन द्यावा.मी आपले अभिनंदन करीन.आभार मानेल असे माजी आ.धोंडे शेवटी म्हणाले.
-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या