Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.सत्यजित आणि डॉ.शिवानी यांचा साक्षगंध सोहळा शाही थाटात संपन्न ..... पत्रकार उत्तम बोडखे यांची कन्या आणि प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांचे चिरंजीव

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची कन्या डॉ.शिवानी आणि कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता डॉ.हरिदास विधाते यांचे चिरंजीव डॉ.सत्यजित यांचा साक्षगंध सोहळा तथा साखरपुडा कार्यक्रम आज रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाही थाटात संपन्न झाला.पत्रकारिता, शिक्षण,सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाभिमुख परिवार म्हणून बोडखे परिवार व विधाते परिवाराकडे पाहिले जाते. बोडखे परिवारातील अत्यंत सालस संस्कार संपन्न अशा डॉ. शिवानी या एमबीबीएस हे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर आहेत तर प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांचे चिरंजीव डॉ.सत्यजित हे सुद्धा आरोग्य क्षेत्रामध्ये एमडी या पदव्युत्तर शिक्षणामधील उच्चपदस्थ आहेत.आज या रविवारच्या शुभमंगल दिनी कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात बीड, संभाजीनगर, नाशिक,मुंबई,अहिल्यानगरसह विविध भागातून आलेल्या संत महंत,राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,वैचारिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा साक्षगंध तथा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील संत सज्जनांनी भविष्यातील या परिवारासाठी शुभेच्छा दिल्या.या साखरपुडा सोहळ्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे,सौ. दमयंतीताई धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे, अजितदादा वरपे,सौ.आशाताई वरपे,युवा नेते सागर धस,हनुमंत थोरवे,महेबुब शेख,उध्दवबापु दरेकर,बाबुशेठ भंडारी,ॲड. साहेबराव म्हस्के,नियामत बेग, सतीष शिंदे,सेवानिवृत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण,मुंबई पोलीस उपायुक्त बजरंग बन्सोडे,अजय धोंडे, अभय धोंडे,रमजान तांबोळी, राजेंद्र ताठे,अदित्य ताठे,जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे सर, आण्णासाहेब चौधरी,शिवाजी राऊत,दत्ताभाऊ काकडे, प्रा.एस.ए.सोमवंशी,एस.ए. बनसोडे,डाॕ.दर्शना बारवकर, मनिषा चवरे,सौ.विद्या चव्हाण, संतोषभैय्या चव्हाण,डाॕ.डी.बी. राऊत,प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी श्रीगोंदा,प्राचार्य डॉ. जयसिंगराव भोर,प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे, प्राचार्य दत्तात्रय वाघ,प्राचार्य डॉ खेमगर,सुनिल नाथ,युवराज पाटील,अनिल ढोबळे,धैर्यशील थोरवे,आण्णा नाथ,संजय ढोबळे,डाॕ.अशोक गांधी,डाॕ.सचिन टेकाडे, रामशेठ मधुरकर, सावता ससाणे, बाळासाहेब भुकन,यशवंत खंडागळे,राजेंद्र धोंडे,अशोक साळवे,ॲड.बाबुराव अनारसे, उपसभापती नामदेव धोंडे, परिवंत गायकवाड, दिलीप बन्सोडे,प्रल्हाद खेतमाळस,राम बन्सोडे,विजयशेठ मेहेर,नायब तहसिलदार भगीरथ धारक, नामदेव राऊत,विठ्ठलराव बन्सोडे,विक्रम पोकळे,पोपट घुले,ॲड.रत्नदीप निकाळजे, सिताराम पोकळे,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,सतीषमामा झगडे, बाळासाहेब वाघुले,दिलीप काळे, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, रंगाण्णा धोंडे, राजेंद्र काळे,अभय शिंदे,सुरेश वारंगुळे, सुनिल म्हेत्रे,संदीप सुंबरे,अरुण सायकड, राजेंद्र लाड,विनोद ढोबळे,मुस्ताक शेख,राजेश राऊत,रघुनाथ कर्डीले,प्रविण पोकळे,अविनाश कदम,व ईतर सर्व पत्रकार,संपतराव धोंडे,शेख अन्सारभाई,डाॕ. उत्तम शिंदे,दादा झांजे,दवा गव्हाणे, डाॕ.राहुल घाटूळ परभणी, बाळासाहेब शिंदे,बन्शीभाऊ पोकळे यांच्यासह ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प.आजिनाथ अंधाळे महाराज, माजी शिक्षणाधिकारी ह.भ.प पांडुरंग जाधव गुरुजी, ह.भ.प. मंदार बुवा, ह.भ.प.राऊत दादा महाराज, निळकंठ तावरे महाराज,संतोष मोरे,राजेंद्र लोखंडे महाराज,निवृत्तीदादा बोडखे महाराज, आप्पासाहेब सुंबरे महाराज, महाराज,दादा महाराज चांगुणे, यांच्यासह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन निलेश दिवटे यांनी तर या पारिवारिक कौटुंबिक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे आभार प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांनी मानले. ----------------- चौकट -------- संस्कार संपन्न परिवारासाठी संत सज्जनांचे आशीर्वाद! -------------- आज रविवारी कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या बोडखे आणि विधाते परिवाराच्या साक्षगंध सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातून नावलौकिक प्राप्त मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती सातत्याने इतरांसाठी योगदान देत आपल्या जीवनाची कर्तव्य पुरती करणाऱ्या या दोन्ही परिवारातील या कौटुंबिक पारिवारिक स्नेहाच्या नातेबंधनासाठी उपस्थित राहिलेल्या राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील गुनीजणांनी दोन्ही परिवाराच्या भविष्यातील यशदायी प्रवासाला मनोमन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या