
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील महेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी
माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कर्ज रक्कम भरून कारखाना
सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.कारखान्याचे यंदा धुराड पेटवण्याच्या
दृष्टीने प्रगतीपथावर कामकाज सुरू झाले होते.परंतु राज्य व केंद्र सरकारने परवाना
रद्द केला असून रद्द केलेला परवाना पूनर्स्थापित करा या मागणीसाठी कार्यक्षेत्रातील
सभासद,ऊसउत्पादक,शेतकरी व संचालक मंडळ यांचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या
नेतृत्वाखाली दि.३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार
असल्याचा इशारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे दि.२६ ऑक्टोबर रोजी
दिलेल्या निवेदनद्वारे दिला आहे.दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, महेश
सहकारी साखर कारखाना बीड, अहिल्यानगर,धाराशिव ७ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा
मोठा वर्ग या कारखान्यावर अवलंबून असून मोठ्या प्रमाणावर दुष्काळी आष्टी म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार होता.अनेक
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम लागले असते परंतु राज्य व केंद्र शासनाने या
कारखान्याचा परवाना रद्द केला आहे. कारखान्यावरती असलेले बँकेचे कर्ज माजी आ.भीमराव
धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने नेल करून कारखान्याचे धुराडे
पेटवण्याच्या दृष्टीने कामकाज प्रगतीपथावर सुरू करण्यात आले होते.परंतु सरकारने हा
परवाना रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कारखाना कार्यरत
नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून इतर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या
तयारीत असताना देखील आमच्या कारखान्याचे सर्व काम ठप्प झाले आहे.याच पार्श्वभूमीवर
माजी आ. भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षेत्रातील सभासद,ऊस उत्पादक
शेतकरी ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी
कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या