
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक
बाळासाहेब डोके यांची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी क-हेवडगावच्या सरपंच सौ. वंदना
परिवंत गायकवाड यांनी आ.सुरेश धस आणि गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांच्याकडे
लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
की,आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथील ग्रामसेवक दिपाली गायकवाड यांच्याकडून
नागरीकांचे घरकुल, विहीरी, जन्मनोंद, मृत्युनोंद,विवाह नोंद आदी कामे वेळचेवेळी होत
नसल्याने या गावातील नागरीकांची गैरसोय होत आहे. दि.२७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे गावातील नागरीकांचे पंचनामे देखील करण्यात आलेले
नाहीत.घरकुलांचे कामे प्रलंबीत आहेत त्यामुळे आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव येथे
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून बाळासाहेब डोके यांची नेमणुक व्हावी अशी
ग्रामस्थांकडुन मागणी होत आहे.नागरीकांच्या गैरसोयीमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या
देखील तक्रारी आल्या आहेत.यापुर्वी बाळासाहेब डोके हे ग्रामपंचायत कार्यालय
कऱ्हेवडगाव येथे ग्रामसेवक म्हणून काम करत होते त्यांचे काम अत्यंत समाधानकारक
आहे.त्यामुळे ग्रामपंचात कार्यालय क-हेवडगाव येथे अनुभवी ग्रामसेवक बाळासाहेब डोके
यांची तात्काळ नेमणुक करुन क-हेवडगाव ग्रामपंचातीचा पदभार चार्ज यादी (कॅशबुक,सर्व
खात्यांचे चेकबुक, १५ वित्त आयोगाचे कॅशबुक,गावातील ग्रामपंचात अंतर्गत कामाचे
एम.बी.,पी.टी. आर. रजिष्टर, जन्मनोंद रजिष्टर, मृत्युनोंद रजिष्टर, ई.ग्रा.प.,
संदर्भातील कागदपत्रे ) यासह चार्ज बाळासाहेब डोके यांनी चार्ज घेवून तात्काळ
नेमणुक व्हावी यासाठी आदेश व्हावेत अशी विनंती सरपंच सौ.वंदना गायकवाड यांनी केली
आहे.
-----------------
0 टिप्पण्या