आष्टी (प्रतिनिधी) भवरवाडी येथील ज्ञानेश्वर सेवा संस्थांन येथून संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दि.८ नोव्हेंबर रोजी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. ह.भ.प. कांताताई सोनटक्के महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २४ वर्षापासून पायी दिंडीचे आयोजन केले जाते. हा पायी दिंडी सोहळा दि.८ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होत आहे.हा पायी दिंडी सोहळा भवरवाडी, अरणगांव,खडकत, माहीजळगांव , खंडेश्वरी टाकळी, बिटकेवाडी,बावडी, आढळगांव,श्रीगोंदा कारखाना,वांगदरी, थोपटेवाडी,न्हावरा,तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, साबळेवाडी, शेलपिंपळगाव, निमगांव भोगी ते आळंदी असा मार्ग आहे.दि.१४ नोव्हेंबर रोजी दिंडी आळंदीत पोहोचणार आहे. दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी ह.भ.प. डी.एस.राऊत (सर) (जळगांव) यांची सकाळी तर दुपारी गुरुमाऊली नर्सरी, भिकाजी रासकर, रामकृष्ण शेलार आणि संध्याकाळी संजीवन मेंडकर, नारायण दौड यांची पंगत होणार आहे. रविवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १० वेळात भागवताचार्य तथा दिंडीचालक ह.भ.प.कांताताई सोनटक्के यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.यानंतर महाप्रसादाची महापंगत हनुमान पवार,प्रियदर्शनी महिला भजनी मंडळ हरिणारायण आष्टा यांच्यावतीने होणार आहे.या पायी दिंडी सोहळ्यात भवरवाडी,आष्टा , ह.ना.जामगांव नान्नज जवळा, आष्टी,आरणगांव, गरडाचे पाटोदा येथील भाविक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.