
आष्टी (प्रतिनिधी) श्री क्षेत्र वेरूळ हे विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांचे शक्तिपीठ
आहे म्हणूनच दर्शवर्षी १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील तमाम सुतार,
लोहार,सोनार,तांबट,शिल्पकार, जांगिड व पांचाळ समाज बांधव इथे मोठ्या संख्येने एकत्र
येतात प्रभू भगवान श्री विश्वकर्मांच्या चरणी लीन होतात आणि मोठी ऊर्जा घेऊन जातात
असे प्रतिपादन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नागोजीराव
पांचाळ यांनी केले. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी
श्री क्षेत्र वेरूळ येथील प्रभू श्री विश्वकर्मा मंदिरात आयोजित विश्वकर्मा पूजन
दिन व विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांच्या राज्यव्यापी महा मेळाव्यात अध्यक्षीय
भाषणात ते बोलत होते.गुरुवर्य महंत महेंद्र बापूजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत
झालेल्या या मेळाव्यास गंगापूरचे आ.प्रशांत बंब, छत्रपती संभाजीनगर येथील
विधानपरिषदेचे आ.संजय केणेकर, मनमाडचे मा. आ. राजेंद्र देशमुख, नियोजन समितीचे
अध्यक्ष राजेश नागपुरे, जांगिड समाज अध्यक्ष प्रकाश जांगिड, उद्योजक रवींद्र
पांचाळ, उद्योजक समाधान येशीकर, जयमाला खेडकरता, कार्याध्यक्ष अरुण भालेकर,
उपाध्यक्ष गोपाल राऊत,सचिन सुतार, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, सचिव विलास पवार,
कोषाध्यक्ष गणेश गव्हाणे, उपाध्यक्ष धनराज वेलणकर, संजय शहाणे, शिवानंद थोरकर,
रोहिदास जांगिड, उद्योजक तानाजी शेटे, महिला कार्याध्यक्ष शुभदा धामापूरकर, कोकण
विभागीय अध्यक्ष रामचंद्र मिस्त्री, पराग अहिरे, सुनीता भालेराव आदी मान्यवर
विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रा. नागोजीराव पांचाळ म्हणाले की,
इथून पुढच्या काळात समाजाच्या दशा आणि दिशा काय असेल आणि त्यासाठी काय कृती
कार्यक्रम राबवावा लागेल याबाबत संघटनेने गांभीर्यपूर्वक विचार करून भविष्य काळातील
ध्येय धोरणे व दिशा ठरवली आहेत. त्यानुसार आपण मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त आहे.
न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण न्या. रोहिणी
आयोज म्हणजे मायक्रो ओबीसींच्या संरक्षणाची ढाल आहे. नवीन पिढीने इथून पुढे उच्च
शिक्षणातील नवीन वाटा व नवनवीन क्षेत्र निवडले पाहिजे. त्याच बरोबर आगामी जिल्हा
परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगर पालिका या स्थानिक संस्थांच्या निवडणुका
समाज बांधवांनी लढविल्या पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी आ. प्रशांत बंब,आ.संजय
केणेकर, गुरुवर्य महंत महेंद्र बापू, अरुण भालेकर, पराग अहिरे यांचीही भाषणे झाली.
राजेश नागपुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना, संघटनेची ध्येय धोरणे व दिशा याबाबत
सविस्तर विवेचन केले. सुदाम नलावडे यांनी युवकांना उद्योगाविषयी मार्गदर्शन केले तर
विजय सुरासे यांनी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. लवकरात लवकर रोहिणी आयोग
शिफारशी लागू कराव्यात.या विश्वकर्मा समाजास अती मागास प्रवर्गात टाकावेत.सुतार
लोहार सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली पण अजूनही
एकाही महाराष्ट्रातल्या कारागिरास आर्थिक लाभ मिळाला नाही त्या करिता शासनाने गंभीर
पाऊल उचलावे.शासनाने PM विश्वकर्मा योजना चालू केली यातून निश्चित किती विश्वकर्मा
सुतार लोहार सोनार तांबट पाथरवट यांना लाभ मिळाला आहे याची श्वेतपत्रिका काढावी.
विश्वकर्मा वंशीय समाज हा शिल्पकार समाज आहे त्या करिता शिल्पकला विद्यापीठ स्थापन
करून त्याला भगवान विश्वकर्मा शिल्पकला विद्यापीठ नाव द्यावे.दि.१७ सप्टेंबर रोजी
विश्वकर्मा जयंती भारत भरात साजरी केली जाते त्या दिवशी सार्वजनिक शासकीय सुट्टी
जाहीर करावी.शासकीय योजनेत विश्वकर्मा वंशीय समाज संघटन पदाधिकारी यांना शासन मान्य
सदस्य म्हणून राज्य जिल्हा पातळीवर घ्यावेत जेणे करून समाज बांधव भगिनी यांना लाभ
देण्यास मदत होईल.या सर्व आपल्या मागण्या स्थानिक आमदारा समोर अरुण भालेकर राज्य
कार्याध्यक्ष यांनी मांडल्या. सकाळी प्रभू विश्वकर्मा मंदिरात गुरुवर्य महंत
महेंद्र बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा, अभिषेक व होम, हवन झाले. त्यानंतर
लोकमाता अहिल्यादेवी होळकर जल कुंडापासून प्रभू विश्वकर्मांच्या प्रतिमेची सवाद्य
मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते.विजय पांचाळ व भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सुतार व
अरुण भालेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा नियोजन समितीचे
अध्यक्ष अमोल डोळस,चंदू हिवाळे, परमेश्वर पांचाळ, राजकुमार राऊत, प्रसाद गडकर,
बालाजी पांचाळ, अरुण वाघमारे, गोपाल राऊत, व्यंकट पांचाळ यांनी परिश्रम घेतले.धनराज
वेलणकर राज्य उपाध्यक्ष,रामचंद्र मिस्त्री, विकास सुतार ,दिलीप पांचाळ,गणेश
गव्हाणे,केशव सपकाळ,सचिन सुतार ,संजय सुतार,विलास पवार,व्यंकट पांचाळ,गणेश
आढाव,बालाजी सांगुळे,अशोक गायकवाड, सत्यनारायण पांचाळ,सर्जेराव कळसकर, विशाल जवरकर,
बालाजी पांचाळ,कल्याण घुसळकर यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
0 टिप्पण्या