आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आणि जालना
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज बुधवारी लेखन,निवेदन आणि
शिक्षण क्षेत्रामधील गुनी व्यक्तिमत्व प्रा.बिभिषण चाटे यांचा आदर्श शिक्षक
पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला.जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित बीड येथील
पुरस्कार वितरण समारंभात हा सन्मान करण्यात आला.यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष
मानूरकर,भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर
काजी,भाजपाचे प्रदेश सहप्रवक्ते राम कुलकर्णी, वैभव स्वामी, बालाजी तोंडे, नवनाथ
शिराळे, अशोक लोढा आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रा.चाटे सर यांच्या अनेक
वर्षाचा लेखन निवेदन शिक्षण क्षेत्रामधील विशेष योगदान याची दखल घेत ना.पंकजाताई
मुंडे यांनी प्रा.बिभीषण चाटे यांना विशेष सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह
देऊन त्यांचा गौरव केला.प्रा.चाटे यांच्या गेल्या २२ वर्षाहून अधिक कालावधीमध्ये
अत्यंत संयमितपणे आणि बंधुत्व बांधिलकीच्या दृष्टीने केलेले लेखन कौतुकास्पद असून
त्यांच्या या कर्तव्य भावनेचे विशेष जाहीर कौतुक केले. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर
देशमुख यांनी प्रा.बिभीषण चाटे यांचे लेखन हे सकारात्मक आणि विविध क्षेत्रांमध्ये
परिवर्तन आणि समता प्रस्थापित करणारे असल्याचे सांगून अभिनंदन केले. याप्रसंगी या
विशेष गौरवाबद्दल प्रा. बिभीषण चाटे यांचे नॉलेज प्लांटच्या मुख्य संचालिका
गीतांजली जायभाये,गणित तज्ञ विठ्ठल जायभाये, के एस के कॉलेजच्या उपप्राचार्य
श्रीमती डॉ. शिंदे मॅडम, आदर्श गुरु सर्जेराव वारे, ग्रामस्थ अधिकारी श्रीमती सविता
वारे, भाग्यश्री ताई गडदे, श्रीमती आशा फड यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील
मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
चौकट
--------
प्रमाणिक लेखणीच्या
सातत्याचे फळ!
--------------------------

प्रा.बिभीषण चाटे यांनी गेल्या दोन दशकाहून अधिक
कालावधीत असंख्य विषयावर वृत्तपत्राच्या लेखनातून क्रांती घडवली आहे. ही बाब लक्षात
घेऊन खुद्द पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे व्यासपीठावर विशेष कौतुक केले. यावेळी
संपादक संतोष मानूरकर यांनीही दुजोरा देत हा त्यांच्या प्रमाणिक सकारात्मक
सातत्यपूर्ण लेखणीचा सन्मान असल्याचे अधोरेखित केले.
0 टिप्पण्या