Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी मतदार संघाच्या सर्वांगीण समाजक्रांतीचे जनक : भीमराव धोंडे साहेब

विशेष लेख ---------- उत्तम बोडखे आष्टी
'अत्तर लावताना लावणाऱ्याच्या हाताला लागते...सुखाचे तसेच आहे. दुसऱ्याला सुख देताना आपल्यालाही मिळते हे डॉ. राधाकृष्णन् यांचे विचार अगदी प्रत्यक्ष जीवनात आणण्याचा प्रयत्न करत सेवाभावी वृत्तीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या जीवनात नवा तेजस्वी क्रांतीचा उदय व्हावा... या व्यापक अपेक्षेने गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ सदैव रस्त्यावर राहून प्रामाणिकपणे राजकारण,समाजकारण, सचोटीने करून आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाते आणि समाज क्रांतीचे जनक म्हणून शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाची झळाळी आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे! आत वेगळा बाहेर वेगळा असा दुरंगी स्वभाव भीमराव धोंडे यांचा नाही.त्यांच्या शब्दावर लोक निर्धास्तपणे विश्वास ठेवतात.उठसुठ कुणाच्याही पायाला हात लावण्याचे दिखाऊ नाटक त्यांनी आतापर्यत कधी केलेले नाही.शेतकऱ्यांचे खरे नेते वंचीतांचा आवाज अशी भीमराव धोंडे यांची समाजात प्रतिमा आहे.भीमराव धोंडे साहेब यांच्या विद्यार्थींदशे पासुनच संगे गोपाळांचा मेळा होता.आजही तो मेळा तसाच आहे.अनेकांनी मिञ बदलले पण धोंडेसाहेब यांनी मिञांना, मैञीला अंतर पडू दिलेले नाही. धोंडेसाहेब यांनी मिञ जपले आणि कायम ठेवले. माणुसकीचा केंद्रबिंदू म्हणजे धोंडे साहेब! ------------------------ मिञांमध्ये ना जातीचा भेद ना धर्माचा भेद,ना धनदौलतीचा ना गरीब,श्रीमंतीचा भेद केला. गरीब मिञ असला तरी त्याच्या संगतीची त्यांनी कधी लाज बाळगली नाही.प्रसंगी ते म्हणतात याच मिञांची तर पुण्याई फळाला आली.फक्त मिञांमुळे व माझ्या खेळामुळे मी राजकारणात, समाजकारणात " सक्सेस " झालो.हा मिञ मंडळीना श्रेय देण्याचा मोठेपणा कधी लपवत नाहीत.आज मी ज्या पायरीवर उभा आहे तो सर्व क्षेत्रातील मिञ,सहका-यांमुळेच आहे हेही धोंडेसाहेब आवर्जुन सांगतात. मानवता वादाची विन; त्यांच्या जीवनाचा आदर्श! ----------------------- श्रीमंत व्यापारी,बिल्डर, आमदार,खासदार,मंञी, मोठमोठाले राजकीय नेते यांच्याबरोबर संबधांची पक्की वीण विणलेली आहे.मुड असेल तेव्हा मिञांमध्ये,कार्यकर्त्यात दिलखुलास गप्पांचा अड्डा जमतो.हसतात की असे त्यात मुळीच नाटक नसते.त्यांनी कधी कुणाची नक्कल केली नाही.राजकारणातही आणि सामाजिक जीवनातही कुणाला न दुखविणे,दिलेला शब्द न पाळणे असे ते करतच नाहीत. कधी विरोधकांवर बोचरी टिका करतही नाहीत. गरीबा विषयी कणव; सहकार्याची भूमिका... --------------------- लोकनेते भीमराव धोंडेसाहेब यांना आयुष्यात जवळपास "मंञीपद" वगळता सर्वच मिळत आले आहे.अनेक गरीब मिञांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च त्यांनी केलेला आहे. त्या मिञांची नावे लिहणेही योग्य नाही.त्यांच्या मिञांच्या दुःखद, अवेळी निधनानेते हळवे होतात.त्यांच्या मुलांना, जावायांना संस्थेत नौकरी देऊन त्यांच्या संसाराची मुहुर्तमेढ रोवली आहे.भीमराव धोंडे यांच्या आवडी बहुविध आहेत. कला,क्रीडा, कुस्ती, नाट्यप्रेमी दिलखुलास व्यक्तिमत्वाचा नेता.. ------------------------ सिनेमा,नाटक पाहतात तसे कुस्त्यांचा फड हा त्यांचा तर अंत्यत आवडीचा विषय आहे.चांगल्या गाण्याच्या कॕसेट ऐकतात.नवनवीन पुस्तकांचे वाचक करतात.आई वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध स्पर्धां, गंगाई - बाबाजी सांस्कृतिक महोत्सव,धार्मिक सप्ताह सोहळे,गुणवंताचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करतात, विव्दाणांची चर्चा सञे घेतात.ते कधीच कर्मकांडात गुंतत नाहीत हे विशेष..लोकनेते भीमराव धोंडेसाहेब हे संत वामनभाऊ महाराज यांच्या गहिनाथगड ते पंढरपूर या दिंडीत हाती टाळ घेऊन,कपाळी टिळा,डोकी टोपी अशा वेशात पायी चालतात. अनेक दिड्यात जातात महाराजांना भेटी देतात.संत मदन महाराज यांच्याही दिंडीत जाऊन ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांना भेटतात. ठिकठिकाणी दिंडीतील वारक-यांना भोजन देतात.ही कार्य शुध्द मनाने केली जाते. सर्वसामान्यांसाठीचे आधारवड धोंडे साहेब! ----------------------- माजी आ.भीमराव धोंडे म्हणजे मातीशी प्रमाणिक राहणारे तरीही आभाळाएवढं व्यक्तीमत्व आहे.सामान्य माणसात राहुन असामान्य कर्तृत्व असलेले.सर्वसामान्य माणसाला न विसरणारं व्यक्तीमत्व.यश आणि अपयश संयमाने पचविणारं व्यक्तीमत्व. जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्राला सहजरित्या स्पर्श करणारं व्यक्तीमत्व. शिक्षणाची गंगा गरिबांच्या घरी आणणारे आधुनिक कर्मवीर! --------------------------- कला,क्रिडा,शिक्षण, साहित्य,मनोरंजन,लोककला,चिञपट आदि क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे.आष्टी ते मुंबई,आष्टी ते दिल्ल्ली हे पायी मोर्चे तर देशभरात गाजले. गिनीज बुकात नोंद होणारी आष्टी ते दिल्ल्ली पदयाञा ठरली." हा शेतकरी राजा घेवुन साथीला आपल्या मायभूमीसाठी मोर्चा काढला दिल्ल्लीला..." समाजातील मानवी जीवन कधीच स्वतंत्र नसते.समाजाच्या सामाजिक, धार्मिक,राजकीय परिस्थितीशी बांधले गेलेले असते.गावाशी एकरूप झालेले असते.तशी प्रत्येक व्यक्ती साखळीप्रमाणे एकमेकांशी जोडली गेलेली असते.मानवी जीवनात प्रवाहीपणा कसा आणायचा हे काळ,परीस्थीतीशी निगडीत असते.लोकसहभागातून परिवर्तन सतत क्रियाशील असते.सामाजिक परिवर्तनासाठी अनुकूल परिस्थितीत समाजातील सगळेच लोक काम करत नसतात,हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक परिवर्तन घडवून आणतात.ते नेतेच दिशादर्शक असतात.त्यापैकी लोकनेते भीमराव धोंडे हे एक आहेत. भीमराव धोंडे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी ------------------------ समाजाच्या जीवन पद्धतीमध्ये ते एकरूप झालेले आहेत. शालेय जीवनासाठी त्यांच्याठिकाणी रुजलेली संघर्षशीलतेची ऊर्मी कमी झालेली नाही.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू सामाजिकतेशी निगडीत आहेत.समाजातील जीवनपद्धती कशीही असो त्या परिस्थीतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाज मनात नेहमी ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. समाजाचा सामाजिक विकास हे ध्येय मानून रात्रंदिवस समाजातील उपेक्षित,दुर्बल, वंचीत,मागासलेल्या लोकांसाठी ते कार्य करीत आहेत. लोकनेते भीमराव धोंडे चतुरस्ञ व्यक्तिमत्व -------------------------- साहिष्णुवृत्ती,उदारपणा,शांत, संयमी स्वभाव या वैभवशाली देणगीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावशील बनवले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन असंख्य कार्यकर्ते घडत आहेत. आष्टी तालुक्यातील राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक विकासाचे दूरदृष्टी असलेले लोकनेते भीमराव धोंडे आहेत. हजारो गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देऊन त्यांच्या चुली पेटवण्याचे काम लोकनेते भीमराव धोंडे यांनीच केलेले आहे.एक प्रगल्भ विचाराचे खंबीर नेतृत्व म्हणजे लोकनेते धोंडेसाहेब आहेत.कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन, त्याचा सखोल अभ्यास करून पुढे काम करणे हे त्यांची प्रवृत्ती आहे.ज्या त्या विषयातील तज्ञांचा सल्ला घेऊन ते कारभार करतात.त्यांची ही कला सर्वमान्य आहे.एका वर्षात एक हजार मित्र मिळविता येणे याला यश म्हणता येणार नाही तर एक मित्र एक हजार वर्षाकरता बनवणे याला यश म्हणतात. सकारात्मक विचाराने जीवन जगणारे आणि राजकारणही करणारे ते एकमेव नेते आहेत. समाजातील सर्व क्षेत्रातील समस्यांची जाणीव आणि ती समस्या दुर करण्याची असलेली दूरदृष्टी असलेले ते नेते आहेत एखादे व्यक्तीमत्व एवढे सामर्थ्यवान असते हे धोंडे साहेबांच्या व्यक्तीमत्वाकडे पाहिल्यानंतर कळते.धोंडे साहेबांनी संपुर्ण राजकीय जीवनात समाजकारणावरच भर दिला आहे.त्यांनी नेहमीच शेतकरी,शेतमजुर व गरीबांना केंद्रस्थानी मानलेले आहे. उत्तम प्रशासक,एक प्रगल्भ, सर्वव्यापी अनुभव असणारे सर्वस्पर्शी त्यांच्या कार्यामुळे राज्यात नावलौकिक मिळविणारे व्यक्तीमत्व ठरले आहे.सर्वाशी मैञी,प्रेमाचे व आपुलकीचे संबंध ठेवण्यामध्ये धोंडेसाहेबांचा हातखंडा आहे. अशा या संघर्षशील आणि खंबीर लोकनेत्यास वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराचेवतीने हार्दिक शुभेच्छा ...!!! ---- उत्तम बोडखे,आष्टी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या