Ticker

6/recent/ticker-posts

चोभानिमगाव येथे पाच ठिकाणी धाडसी दरोडे..माय लेकरास जबर मारहाण; गावातील सायरन वाजल्यामुळे..दरोडेखोर परतले..

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव शिवारात काल गुरुवारी मध्यरात्री वस्त्यावर पाच ठिकाणी पाच सहा चोरांनी धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला एका ठिकाणी वयोवृद्ध आई आणि मुलाला गंभीर जखमी झाले आहेत चोर आल्याची समस्या गावातील सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला सायरन अलार्म वाजवल्यामुळे दरोडेखोरा पासून संरक्षण मिळाले पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली असून या दरोडेखोरांच्या मागावर दोन पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत याविषयीचे सविस्तर वृत्त असे की दि.२१ ऑगस्ट च्या मध्यरात्री चोभा निमगाव येथील माजी सरपंच मधुकर गि-हे, सेवानिवृत अधिक्षक रोहिदास गि-हे, संपत गाडे व सतीष गि-हे यांच्या घरी पाच ते सात चोरांनी दरवाजे तोडून धाडसी धरण्याचा प्रयत्न केला असून रोहिदास गि-हे यांच्या घरातील कपाटातुन एलईडी टि.व्ही. घेऊन गले माजी सरपंच मधुकर गि-हे यांच्या घराचे दार उघडुन घरात प्रवेश करताच घरातील व्यक्ती जाग्या झाल्यामुळे दरोडेखोर पसार झाले.. दरम्यान माजी सरपंच मधुकर गि-हे यांनी आसपासच्या लोकांना फोन करुन जागे केले.गावाच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला सायरन अलार्म वाजविण्यास सांगितले. तोपर्यंत सतीष गि-हे यांच्या घरतील १ लाख २० हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने काढुन नेले. अंगावरील दागीने घेताना महिलांना जबर मारहाण केली.माय लेकरास जखमी केले. आईचा हात मोडला तर मुलाच्या डोक्यात काठ्या गजाने मारहाण केली. मुलगी अश्विनी,मुलगा आरव व सतिष गि-हे यांची पत्नी सौ.अरुणाबाई गि-हे यांना मुका मार दिला व जखमी केले आहे. पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला आहे, बीड पोलीस अधीक्षकांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ दोन पथके आष्टी पोलिसांच्या मदतीसाठी रवाना केली असून दरोडेखोरांना शोधून काढू असा विश्वास आष्टी पोलिसांनी व्यक्त केला आहे श्वान पथकाद्वारे दरडेकरांचा माघ काढण्यात आला असून लवकरच दरोडेखोर पकडले जातील असा विश्वास व्यक्त केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या