Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ व उत्तर प्रदेश केसरी बंटी खान यांच्यात रंगली तीन लाखाची कुस्ती ............ पृथ्वीराजने बंटी खानला दाखविले आस्मन

आष्टी (प्रतिनिधी) कडा येथील यात्रा ही संपूर्ण आष्टी तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून समजली जाते.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा मोठा आखाडा भरविला जातो.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.यावर्षी आ.सुरेश धस हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुस्त्या पाहण्यासाठी थांबले. यावर्षी कडा येथील मौलाली बाबा यात्रेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमची उभारणी केली होती.दुपारी ४ ये रात्री ९ वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा रंगला होता.दूरवरून आलेले खेळणीचे दुकाने रहाट पाळणे व इतर दुकानांसाठी सरपंच युवराज पाटील यांनी मोठ्या प्रमाणात जागेची साफसफाई करून जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवसायिकांची अडचण झाली नाही.कडा येथील यात्रा उत्सव दरम्यान महिला मल्ल मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. काल मंगळवारी चितपट कुस्त्यांचा जंगी सामना कुस्ती प्रेमींना पहावयास मिळाला. महाराष्ट्राचा रांगडा खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्तीच्या डाव प्रतिडावाने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.या आखाड्यात शेवटची कुस्ती ३ लाख रुपयांची महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी बंटी खान यांच्यात झाली.यात मोहळ यांनी बंटी खान यांना अस्मान दाखविले. या कुस्तीचा ३ लाख रुपयांचा इनाम आ.सुरेश धस यांनी स्वतः देऊन दोन्हीही मल्लांचा गौरव केला.हालगीचा आवाज , प्रेक्षकांची तुफान गर्दी,आडदांड मल्लाची उपस्थिती दोन दोन मिनिटाला चितपट होत असलेल्या कुस्तीने खरोखरच कुस्ती शौकिनाच्या डोळ्याचे पारणे फिटले.कडा गावातील उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या भूमिपुत्रांनी १७ कुस्त्या या महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या ठरवून लावलेले होत्या.या कुस्त्यांचे बक्षिसेही त्याच भूमिपुत्रांनी दिली.इतर ३०० कुस्त्यांचा इनाम यात्रा कमिटीने दिले. आष्टी तालुक्यातील कडा येथील सर्व धर्म समभावाचे प्रतिक म्हणून असलेल्या मौलाली बाबा यात्रेला बौद्ध पोर्णिमा पासुन सुरवात झाली आहे.याच यात्रेनिमित्त मंगळवारी जंगी कुस्ती सामने रंगले.अ.नगर,पुणे,करमाळा, बीड, पाथर्डी,आष्टी,दिल्ली, हरियाणा,पंजाब अकलूज यासह अनेक ठिकाणावरून आलेल्या मल्लांनी शौकिनांना खुष केले.दंवडीची कुस्ती ही तीन लाख रुपयांची होऊन आखाडा संपवला.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,यश आजबे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पंच राहुल जगदाळे,सरपंच युवराज पाटील,उपसरपंच दीपक कर्डीले,सभापती रमजान तांबोळी,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,माजी सरपंच रामशेठ मधुरकर, पोलीस निरीक्षक दिनेश आहिरे,पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, संपतदादा सांगळे,संजय गाढवे,संदीप खाकाळ,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,सचिन घावटे,सागर ढोले,किरण काळे,आण्णा नाथ,योगेश भंडारी,संभाजी कर्डीले,बबलू पानसरे, संजयनाना ढोबळे, पत्रकार रघुनाथ कर्डीले,समीर शेख, ग्रामपंचायत सदस्य,यात्रा कमिटी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर,पो.नि. विजय नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे यांच्यासह कडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.यामध्ये अहिल्यानगर,पुणे,सोलापूर, करमाळा,अकलूज आदी ठिकाणचे महिला मल्ल उपस्थित होते.महिलांनीही चितपट कुस्त्या करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या कुस्ती जंगी हंगाम्याचे रोमहर्षक सुत्र संचालन राजाभाऊ देवकाते यांनी केले. --------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या