आष्टी (प्रतिनिधी)
चौकट
-------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच १० वी.परीक्षेचा दि. १३ मे रोजी लागलेल्या निकालानुसार आष्टी शहरातील वसुंधरा विद्यालयाची संस्कृती ज्ञानेश्वर कोळेकर हिने ५०० पैकी ४९८ गुण मिळवत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.याच शाळेतील सिध्देश शिंदे,श्रीहरि औटे,ओम अग्रवाल,जयराजे कोकणे, प्रगती करडुले नैतिक शिंदे यांनी ९९ टक्के गुण घेतले आहेत.
-------------

महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १० वी. च्या परीक्षेत संस्कृती ज्ञानेश्वर कोळेकर ही (मूळची जामखेड) येथील आहे.संस्कृती कोळेकर ही उपक्रमशील प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर कोळेकर यांची कन्या आहे.आष्टी येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयाची संस्कृती विद्यार्थिनी आहे.संस्कृतीला हिंदी विषयात १०० पैकी १००, सायन्स अॕण्ड टेक्नॉलॉजी १०० पैकी १००,
सोशल सायन्स १०० पैकी १०० तर मराठीत १०० पैकी
९०, इंग्लिशमध्ये १०० पैकी ९९, गणितात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत.अशाप्रकारे तिने ४९८ +२ असे गुण मिळवून संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. संस्कृतीच्या या यशामध्ये वसुंधरा प्रशालेचे संस्थापक
अध्यक्ष मनोरंजन धस,शाळेचे मुख्याध्यापक मंगेश
भालेराव,मुख्याध्यापिका सीमा बोंदार्डे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
माझे पहिली ते तिसरीपर्यंतचे
शिक्षण नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड येथे झाले तर चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आष्टी शहरातील वसुंधरा
माध्यमिक विद्यालयात झाल्याचे
झाल्याचे संस्कृती कोळेकर हिने सांगितले.ती पुढे म्हणाली की, गेली ७ वर्षे जामखेड ते आष्टी, असा दररोज ४० कि.मी.चा
प्रवास करून शारीरिक थकवा
येत होता परंतु वेळेचे नियोजन केल्याने यश मिळवणे सोपे झाले.या यशामागे माझ्या आईची खास मेहनत आहे.
वसुंधरा शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे बारीक लक्ष दिले जाते.त्यांच्या क्षमता प्रत्येक शिक्षकांना माहीत असतात.
वसुंधरा शाळेमध्ये मीच नव्हे तर माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. वसुंधरा प्रशाला ही शाळा नसून एक कुटुंब असल्याचे दैनिक झुंजारनेता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ग्रामीण भागातील
मुलीने एवढे मोठे यश मिळवल्याने तिचे आष्टी शहर, आष्टी तालुका,जामखेड तालुक्यासह राज्यभरातून
अभिनंदन होत आहे.याच शाळेतील सिध्देश शिंदे,श्रीहरि औटे,ओम अग्रवाल, जयराजे कोकणे,प्रगती करडुले नैतिक शिंदे यांनी ९९ टक्के गुण घेतलेले आहेत.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी.चा निकाल जाहीर झाला.आष्टी येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. यामध्ये संस्कृती ज्ञानदेव कोळेकर या गुणवंत विद्यार्थिनीने ५०० पैकी ४९८ गुण घेऊन राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
एकूण परीक्षेला ९५ विद्यार्थी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. निकाल १०० टक्के लागला आहटक्के टक्क पेक्षा व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन ३६ उत्तीर्ण विद्यार्थी झाले आहेत. ९८ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेऊन ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत हिंदी विषयात १०० गुण मिळवणारे आणि गणित विषयात १०० गुण मिळवणारे प्रत्येकी दोन विद्यार्थी आहेत.
गणित विषयात ९९ गुण मिळवणारे पाचा विद्यार्थी आहेत.विज्ञान विषयात १०० गुण मिळवणारे दोन विद्यार्थी आहेत.विज्ञान विषयात ९९ गुण मिळवणारे सहा विद्यार्थी आहेत.सा.शास्त्रे विषयात १०० गुण मिळवणारा एक विद्यार्थी आहे. सा.शास्त्रे विषयात ९९ गुण मिळवणारे पाच विद्यार्थी आहेत.हे या शाळेच्या निकालाचे वैशिष्टे आहेत असे संस्थापक अध्यक्ष मनोज धस यांनी सांगितले.
----------------
0 टिप्पण्या