Ticker

6/recent/ticker-posts

५५ वर्षापासून घाटा पिंपरी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन .............संत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा ज्ञानयज्ञ ; शनिवारी ह.भ.प.इंदुरीकर यांचे कीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) श्री संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन होऊन ३७५ वर्ष झाली आहेत.त्यानिमित्ताने संत तुकोबारायांचे जीवन चरित्र कथा व गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथे दि.१८ ते २५ मे या कालावधीत केले आहे.संत मदन महाराज बिहाणी यांच्या आशीर्वादाने आणि श्री.ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. सप्ताहात श्री.ह.भ.प. रामायणाचार्य संतोष महाराज मोरे (श्री क्षेत्र आळंदी देवाची) यांचे जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा होणार आहे.श्री.ह.भ.प.संपत महाराज दानवे (संगीत विशारद),हंसराज महाराज मगर,सिंथेसायझर वादक श्री.ह.भ.प.कृष्णा महाराज भांड,तबला वादक श्री.ह.भ.प. देविदास महाराज कुटे यांची साथ संगत लाभणार आहे. काकडा भजन,विष्णू सहस्त्रनाम,गाथा पारायण, दररोज दु.३ ते ५ श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा होणार आहे.हरिपाठ, अन्नप्रसाद,रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होणार आहे.या सप्ताहात कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज मोरे यांची कथा होणार आहे.त्यांना साथसंगत सिंथेसायझर वादक कृष्णा महाराज भांड,गायक संपत महाराज दानवे, तबला वादक रविंद्र महाराज (तबला अलंकार) मृदुंगाचार्य अनिकेत महाराज चांगुणे यांची लाभणार आहे.दररोज दुपारी ३ ते ५ या वेळात कथा प्रवक्ते ह.भ.प.भागवताचार्य संतोष महाराज मोरे (आळंदी) यांची संत संगीत तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा होणार आहे. या सप्ताहात काकडा भजन, विष्णु सहस्त्रनाम, गीतापाठ, पसायदान,ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,संगीत भागवत कथा, हरिपाठ,हरिकीर्तन, जागर (संगीत भजन) आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात श्री.ह.भ. प.गणेश महाराज पाटील (श्री क्षेत्र पंढरपूर),श्री.ह.भ.प.सुधाकर महाराज वाघ (श्री क्षेत्र पैठण), श्री.ह.भ.प.सोमिनाथ महाराज पाटील (श्री क्षेत्र आळंदी देवाची),श्री.ह.भ.प.शहाजी महाराज मोरे (श्री क्षेत्र गाथा मंदिर,देहू),श्री.ह.भ. प.संग्राम बापू महाराज भंडारे (श्री क्षेत्र आळंदी देवाची),श्री.ह.भ.प. स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत (श्री क्षेत्र गेवराई) यांचे हरिकीर्तन होणार आहेत. शनिवार दि.२४ मे रोजी राष्ट्रीय धर्माचार्य,समाज प्रबोधनकार श्री.ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांचे सकाळी ११ ते १ यवेळात हरिकीर्तन होणार आहे. शनिवारी रात्री श्री ह.भ.प. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे(श्री क्षेत्र आळंदी देवाची) यांचे हरिकीर्तन होणार आहे.श्री संत मदन महाराज बिहाणी यांनी ५५ वर्षांपूर्वी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताहचा आता वटवृक्ष झाला आहे.दि.२५ मे रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,अभंग गाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत मदन महाराज यांच्या प्रतिमेची आणि ह.भ‌.प‌.बबन महाराज बहिरवाल महाराज यांची टाळ- मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे.दि.२५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संत मदन महाराज संस्थान कडा व गुरुकुल आश्रम धामणगांवचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे सुश्राव्य हरिकिर्तन होईल.त्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल.ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तनास खा.बजरंग सोनवणे,आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ.बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबुब,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार,डॉ. शिवाजी राऊत,सतिषआबा शिंदे,आण्णासाहेब चौधरी, हनुमंत थोरवे,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,जि.प.सदस्य,सभापती, उपसभापती,पं.स. सदस्य,विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या