Ticker

6/recent/ticker-posts

राहुल निकाळजे यांना 'पद्मपाणी' राज्य पुरस्कार जाहिर

आष्टी (प्रतिनिधी) पद्मपाणी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राज्य पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले अंमळनेर येथील भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक राहुल साहेबराव निकाळजे यांना जाहीर झाला आहे.बीड येथे ४ मे रोजी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.पद्मपाणी प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १७ वर्षापासून विविध क्षेत्रातील गुणवंतांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आष्टी येथील राहुल निकाळजे यांची निवड झाली आहे. सन्मान चिन्ह, संविधान प्रत आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.दि.४ मे २०२५ रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सत्कार सोहळा होणार आहे.या पुरस्काराबद्दल निकाळजे यांचे शिक्षक संघटना व सर्वस्तरातुन अभिनंदन होत आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या