Ticker

6/recent/ticker-posts

व्यसनमुक्तीसाठी संतविचारांचीच आवश्यकता ......... ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे

आष्टी (प्रतिनिधी) व्देत संपल्याशिवाय आनंद,सुख , समाधान मिळणार नाही.आनंद हा आपल्या मनावर व अंतःकरणावर अवलंबून असतो. आहे त्यात समाधान मानले तर आनंदी जीवन जगता येते. ठेविले अनंते तैसेची राहावे असे संत म्हणतात.प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. मर्यादेपलीकडे कोणी जाऊ नये. आई-वडील हेच खरे दैवत आहे.आई- वडील देवापेक्षा श्रेष्ठ असतात.तरुण पिढि मोबाईलच्या आहारी जात आहे तशी व्यसनाधिनही होऊ लागली आहे व्यसनमुक्तीसाठी संतविचारांचीच आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांनी केले. आष्टी येथील मनसे नेते कैलास दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंचदिनी किर्तन सप्ताहात किर्तन प्रसंगी ह.भ.प. कोकणे महाराज बोलत होते.यावेळी रविंद्र तवले, नानासाहेब तवले, शिवदास केरुळकर, सुरेश डोमकावळे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प.शिवाजी महराज कोकणे म्हणाले की,सध्याची वाढदिवस साजरा करण्याची पध्दत योग्य आहे की नाही. हे व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून असते. काही लोक याला सकारात्मक मानतात तर काही लोक नकारात्मक मानतात.वाढदिवस साजरा करण्याची पद्धतीमुळे तरूण पिढी व्यासनाधिन होत असल्याचे चित्र आहे.सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वेगळीच आली आहे.त्यामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे.याकडे पालकांनी जबाबदारी म्हणून लक्ष देण्याची गरज आहे.आपले पुर्वज १०० वर्ष जगत होती.आताची पिढी ही ५० ते ६० वर्ष जगत आहेत.माणुस लाख रूपायाच्या गाडीला चांगले पेट्रोल कोणत्या पंपावर मिळते तिथेच टाकतो.पण भगवंताने लाख मोलाचे शरीर दिले त्याची निगा मात्र ठेवत नाही.हेच आपले दुर्दैव आहे. सध्या नामचिंतन हे उध्दाराचे साधन आहे.त्यामुळे चित्ताला सुख व जीवाला हर्ष झाला. रामनामाच्या जपाने कोटी तपाच्या राशी जोडता येतात.हे नाम अहर्निश घेतले तर वैकुंठ प्राप्त होते. हे रामकृष्णनाम हे ध्रुवने घेतले होते असेही ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे यांनी सांगितले. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या