आष्टी (प्रतिनिधी)
येत्या महिनाअखेर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असून
त्यावेळी सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक असतील तितके कर्मचारी नियुक्त करण्यात
येतील..

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांना प्रशिक्षित करण्यात
येईल.प्रत्येक पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात जनता दरबार घेण्यात येईल.. आणि कुणालाही
न घाबरता कोणाच्याही विरुद्ध तक्रार करायची असेल तर माझा बीड पोलीस अधीक्षकांचा
तयार केलेल्या " क्यूआर कोड " वर माहिती पाठवा सर्व माहिती गुप्त राहील आणि
त्यानंतर तात्काळ पोलीस कार्यवाही करतील याविषयी निश्चित रहावे असे प्रतिपादन बीड
पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी केले. आष्टी येथील आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी
कार्यक्षेत्रातील प्रमुख व्यापारी नागरिक आणि पत्रकार यांच्या बैठकीमध्ये प्रमुख
मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी आष्टी पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण
हणपुडे पाटील,आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर,पाटोदा पोलीस निरीक्षक सोमनाथ
जाधव,अंभोरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत
हिंगे,उपस्थित होते पुढे बोलताना पोलीस अधीक्षक म्हणाले प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये
जनता दरबार घेण्यात येणार असून त्यांच्याकडून सूचना मागवणार आहे या बैठका सतत
घेण्यात येतील त्यातून पोलीस आणि जनता सुसंवाद निर्माण होईल बीड जिल्ह्यातील जनता
अत्यंत संवेदनशील असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थे बाबत समाधानकारक वातावरण
आहे विविध पोलीस स्टेशन मध्ये की आयोजित केलेल्या बैठकीतून चांगल्या सूचना मिळत
आहेत त्यापैकी वाहतूक विभागाच्या सूचना या तांत्रिक बाबीवर अवलंबून असल्यामुळे
बीडच्या पथकात द्वारे तालुक्यामध्ये जाऊन वाहतुकीचे नियम समजून सांगणार आहोत. समाज
माध्यमांवर पोलीस विभागाचे चांगले लक्ष असून समाज विघातक पोस्ट वर पोलिसांचे लक्ष
आहे आम्ही गेल्या काही दिवसात अनेक गुन्हे याबाबत दाखल केले आहेत.महाविद्यालयीन
विद्यार्थिनींच्या बाबत तक्रारी करण्यासाठी मुली पुढे येत नाहीत त्यासाठी मी पोलीस
अधीक्षक या नात्याने " क्यूआर कोड " प्रसिद्ध केला आहे त्या क्यूआर कोड चा फोटो
काढून माहिती पाठवायची आहे ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल अगदी माझ्या
सहकार्याला देखील याबाबत माहिती दिली जाणार नाही केवळ मला एकट्याला ही माहिती
मिळणार असल्यामुळे आपण निश्चिंतपणे कार्यवाही करू त्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याची
गरज नाही बीडला एसपी ऑफिसला जाण्याची गरज नाही घरी बसून तुम्ही ही तक्रार करू शकता
२४ तास यासाठी यंत्रणा सुरू आहे प्रत्येक तक्रारीची मी स्वतः दखल घेत आहे त्यामुळे
या क्यूआर कोड चा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की,
नागरिकांनी जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा बिल्डिंग बांधण्यासाठी आपण
लाखो रुपये खर्च करतो त्याचवेळी स्वतःच्या संरक्षणासाठी अल्प खर्चात असलेले
सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि एक कॅमेरा समाजासाठी रस्त्यावर बसवावा त्याचा उपयोग
तुमच्या स्वतःसाठी आणि पोलीस विभागाच्या पुढील तपासासाठी विशेषतः गुन्हेगारांना
शिक्षा देण्यासाठी फायदेशीर होईल त्यामुळे सीसीटीव्ही जास्तीत जास्त बसवण्यावर
नागरिकांनी भर द्यावा असे सांगितले नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर वेळी सर्व
भारतीय आपण एक संघ राहिलोत त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःच्या
स्वार्थासाठी कायदा आणि श्रेष्ठ बिघडेल असे कृत्य करू नये प्रत्येकाने आपापली
जबाबदारी स्वीकारली पाहिजे या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून पोलीस
अधीक्षकांनी आपण समाजातील क्रीम असल्यामुळे आपण सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे
आपण आपल्या गावाला तालुक्याला आणखी दहा वर्षांनी किती प्रगती करावयाची आहे हे
प्रत्येक नागरिकांनी ठरवले पाहिजे त्यानुसार प्रत्येकाने आचरण करावे पोलीस स्टेशनचे
अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत असे वातावरण सध्या जिल्ह्यामध्ये
आहे पोलीस स्टेशन मधील ठाणे अंमलदारांना नवीन कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल
जेणेकरून ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराची तात्काळ दखल घेण्यात येईल यासाठी
पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे लवकरच प्रशिक्षण आयोजित करू असेही त्यांनी सांगितले
या बैठकीमध्ये चांगल्या सूचना आल्या असून त्याबाबत येत्या काही दिवसात निश्चितपणे
सूचनेप्रमाणे कार्यवाही झालेली दिसेल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले या बैठकीमध्ये
पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद साजेदभाई पेंटर,संदीप जावळे, कडा येथील
सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे पत्रकार डॉ.विनोद ढवळे प्रा.मुस्ताक पानसरे,सूरज
शिंदे, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी पोलीस विभागाच्या वतीने
करावयाच्या सूचना मनोवताद्वारे व्यक्त केल्या तर आष्टी येथील ॲड.वाल्मीक निकाळजे
यांनी आष्टी तालुक्यातील खडकत येथील घटनेबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे असे सांगत
तेथील काही अपप्रवृत्ती सामाजिक विद्रोह पसरवत आहेत.त्याचा बारकाईने तपास करून
त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यावर पोलीस
अधीक्षकांनी याबाबत अत्यंत बारकाईने तपास करू असे आश्वासन दिले आणि सूचना दिल्या
आहेत त्यांची निश्चितपणे अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी
दिले. यावेळी आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी प्रास्ताविक केले.या संपूर्ण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंतदेवा जोशी यांनी
तर आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी आभार मानले.या बैठकीसाठी
आष्टीचे सामाजिक कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर, शेरी खुर्द येथील
सरपंच संजय थोरवे,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पवार,कडा येथील
ग्रामपंचायत सदस्य बिपीन भंडारी,दीपक उंबरकर, माजी पंचायत समिती सभापती गौतम सावंत,
इम्रान पानवाले इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या