Ticker

6/recent/ticker-posts

डाॕ.शैलजा गर्जे यांना मातृशोक

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील पद्मावती विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा आष्टीचे माजी नगरसेवक दादासाहेब उर्फ पप्पू गर्जे आणि माजी केंद्रप्रमुख सौ.मंगलप्रभा तांदळे आणि भाजप नेत्या डॉ.शैलजा गर्जे यांच्या मातोश्री प्रयागाबाई आनंदराव गर्जे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.जिद्दीने त्यांनी सर्व मुलांना, मुलींना उच्चशिक्षित केले.त्यांच्यावर ब्रम्हगाव रोडवरील गर्जेवस्ती येथे रविवारी रात्री अंत्यविधी झाला. अंत्यविधीस किशोरनाना हंबर्डे, डॉ.विलास सोनवणे, चेअरमन आदिनाथ सानप,राजेंद्र धोंडे, माजी तहसीलदार शहादेव गिते,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,पत्रकार अनंत हंबर्डे,पत्रकार उत्तम बोडखे आदि राजकीय,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर वकील,प्राध्यापक, डॉक्टर,शिक्षक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या