Ticker

6/recent/ticker-posts

सहा महिन्यापासुन मजुरी न मिळाल्याने हमालांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु

आष्टी (प्रतिनिधी) पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील सर्व गोदामातील हमालांना मागील सहा महिन्यापासून मजुरी मिळालेली नाही असा आरोप निवेदनाद्वारे शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत संलग्न महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ संघटनेचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.सहा महिन्यांपासून गोदाम हमालाची मजूरी मिळत नसल्याने २६ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आष्टी तालुक्यातील आष्टी,कडा गोदामातील हमालांनी देखील मागील १२ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत सलन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि.२४ फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे. यामध्ये जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील सर्व गोदामातील हमालांना सहा महिन्यापासून मजुरी मिळालेली नाही.ती तात्काळ मिळावी महागाई निर्देशांक बाबत उच्च न्यायालयाने दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.शासनाने आदेश देऊनही थेट वाहतूक टप्पा एक व टप्पा दोन मे काम गोदामातील हमालांकडून करून घेण्याचा आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.माथाडी मंडळांनी बीड शहर गोदामातील हमालीचे काम पूर्ववत त्याच गोदामातील हमालांकडून करून घेण्याचा पत्राबाबत कारवाई नाही.सर्व सोडवणूक व्हावी यासाठी दि.२६ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.सोमवारी आष्टी तहसिल कार्यालयासमोर आष्टी,कडा येथील शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत यांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.या जिल्हा काम बंद पुकारलेल्या आंदोलनामध्ये शासकीय गोदाम आष्टी येथील दत्तु धोंडे,रावसाहेब गाडे,संतोष शिरोळे कडा,दत्ता चौधरी कडा,बाबासाहेब शिंदे,परसराम धोंडे,संतोष कावेदार,प्रविण धोंडे,संदीप पवार,योगेश घावटे,रविंद्र दिवटे,अंकुश खिळदकर, अक्षय सोनवणे,राम मांडकर,संतोष कावेदार,भाऊसाहेब शिंदे, शरद गणगे,जालींदर राऊत आदी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण संघटनेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या