Ticker

6/recent/ticker-posts

चेअरमन जाकीरभाई शेख यांना पाच एकरत २० लाख नफा होणार ................. केरुळ येथे चेअरमन जाकीरभाई शेख या शेतकऱ्यांच्या घामाच्या धारांनी लगडले द्राक्ष बागेत मोती..!

उत्तम बोडखे.आष्टी. --------------- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि प्रचंड संघर्ष वाट्याला असताना केवळ शेतीची आवड असल्याने त्यावर मात करत हलक्या प्रतीच्या रानावर सिंचन सुविधा उपलब्ध करून फळबागा फुलवण्याचे अमूल्य कार्य आष्टी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केले आहे.त्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून केरुळचे चेअरमन जाकीरभाई शेख यांच्या संकल्पनेचे चीज झालेली दिसून येत आहे.केरुळ येथे शेतीनिष्ठ शेतकरी चेअरमन जाकीरभाई यांनी आपल्या जमिनीमध्ये नवीन संकल्पनेच्या आधारे संशोधन करून आधुनिक यंत्र तंत्रांच्या माध्यमातून फळबागा करण्याचे धोरण अवलंबिले.त्यानुसार कृषी क्षेत्रातील अधिकारी शेती क्षेत्रातील अभ्यास अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनातून तसेच कुटुंबातील बंधू भगिनींच्या सहकार्याने द्राक्ष बागेचा प्रयोग सुरू केला.प्रचंड मशागत नियोजनबद्ध परिश्रम खत आणि औषधांचा सुयोग्य वापर यातून त्यांनी सुंदर अशी द्राक्षबाग फुलवले आहे.आज येथे पाच एकरात द्राक्ष बाग फुललेली पाहायला मिळते आहे.गाव आणि परिसरातील महिला शेतकरी भगिनींच्या परिश्रमातून त्यांनी या बागेत घामाच्या धारांनी बनलेल्या द्राक्ष बागेच्या मोत्यासमान या फळाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून कृषी प्रेमी भेट देत आहेत.आज माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे व सहकाऱ्यांनी इथे भेट घेऊन माहिती घेतली.यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी चेअरमन जाकीरभाई शेख यांच्या विशेष परिश्रम संकल्पना नियोजन यातून ही फुललेली लगडलेली द्राक्ष बागेची किमया प्रेरणास्थानी बनली आहे.केरुळ येथे अत्यंत प्रतिकूल भूभागांमध्ये शून्यातून विश्वाची निर्मिती करण्याजोगी कामगिरी कृषी क्षेत्रातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत कष्टप्रद जीवन जगत द्राक्ष बाग फुलवली आणि सबंध आष्टी तालुक्याचा प्रेरणास्त्रोत निर्माण झाला.ही किमया केली आहे. शेतीनिष्ठ शेतकरी आणि प्रयोगशील कृषी क्षेत्रातील दीपस्तंभ अर्थातच चेअरमन जाकीरभाई यांनी! अपार कष्ट मेहनत जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आष्टी तालुक्यातील केरुळ येथील जाकीरभाई व त्यांचे या दोन्ही बंधूंच्या सुयोग्य विचार अन् कार्यातून कृषी क्षेत्रामध्ये अभिनव प्रयोग करत द्राक्ष बागेचा प्रयोग यशस्वी केला आहे.या बागेला आज रविवारी आष्टी येथील जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्यासह आदींनी भेट देऊन पाहणी केली.यामागील सर्व कष्टप्रद भूमिका जाणून घेतली.आष्टी तालुका तसा कृषी क्षेत्रामध्ये मागासलेला.नैसर्गिक शेती अत्यंत प्रतिकूल,खडकाळ,मुरमाड जमीन.जलसिंचनाचा अभाव त्यामुळे येथील ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी शेतमजूर ऊसतोड कामगार पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जातात परंतु अशा अवस्थेमध्ये खचून न जाता चेअरमन जाकीरभाई यांनी शेतीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करण्याचा ध्यास मनी घेतला त्याची सुरुवात ही केली आणि यश मिळवले.! आष्टी तालुक्यात केरुळ चोभानिमगांव,टाकळसिंग येथे यापूर्वी द्राक्ष बागा आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सर्वसामान्य मुरमाड जमिनीमध्ये प्रचंड मेहनत,कष्ट,जिद्द आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यातून याही जमिनीमध्ये उत्तमरित्या द्राक्ष बाग फुलवून तमाम शेतकरी बांधवांना प्रेरणा दिली आहे.त्यामुळे चेअरमन जाकीरभाई शेख यांचे आष्टी तालुक्यात कौतुक होत आहे. आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात तालुक्यातील इतर गावच्या फळबागांची माहिती आणि प्रेरणा घेऊन आपल्या शेतातही विविध फळांच्या बागा करण्याचा प्रयोग जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी करून दाखवला आहे.केरुळ हे राजकीय,सामाजिक,क्रिडा (पैलवान) आणि शैक्षणिक दृष्ट्या तालुक्यातील एक सर्वपरिचित गाव आहे.या गावच्या शेतकऱ्यांना विविध नाविन्यपूर्वक काहीतरी घडवण्याच्या सातत्याने प्रेरणा असतात.यंदा या ग्रामस्थांनी शेतीमध्ये विविध फळबागा करण्याच्या प्रयोगाची सुरुवात केली.विशेषतः द्राक्ष बागेला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रचंड कष्टाच्या बळावर त्यांनी यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे.चेअरमन जाकीर शेख पाच एकर,अमोल बाबुराव सुयवंशी दोन एकर,हरिभाऊ उर्फ बाळासाहेब अनारसे दोन एकर,विष्णु मोहळकर दोन एकर असे एकुण ११ एकर द्राक्ष बाग आहेत.चेअरमन जाकीरभाई यांची आठ वर्षाची बाग आहे.पाच हजार झाडे आहेत.आठ बाय पाच फुट अंतरावर लागवड केलेली आहे.सातवे पिक आहे.लागवडीनंतर एक वर्षानंतर बागेत पीक घेतले.कमी पाण्यावर द्राक्ष येते अशी माणिक चमन,अनुष्का वाणाचे त्यांची फळबाग आहे. यावर्षी स्वच्छ वातावरण असल्याने मालाला तेजी आहे.यावर्षी हवामान चांगले आसल्याने व पवित्र रमजान महिना असल्याने द्राक्षाला दुप्पट भाव मिळत आहे.यामुळे द्राक्ष बागाईतदार समाधान व्यक्त करीत आहेत.गतवर्षी द्राक्षाला भाव नसल्याने शेतकरी तोट्यात गेले होते.शेती अथवा बळबाग जुगार असतो हे यावरुन सिध्द होते.पाच एकर बागेसाठी १० लाख वार्षिक खर्च झाला असुन ३० लाख रुचे उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे चेअरमन जाकीरभाई यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना सांगितले. चौकट ------- केरुळ परिसरात माझी आठ वर्षापसुन पाच एकर द्राक्ष फळबाग आहे.एक धाडसाचा प्रयोग म्हणून मी हा प्रयोग केला.तो यशस्वी झाला आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता फळबाग शेती करावी असे माझे शेतकरी बांधवांना आवाहन असेल. ---चेअरमन जाकीरभाई शेख (प्रयोगशील शेतकरी) ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या