आष्टी (प्रतिनिधी)
भारतीय संस्कृतीतील चालीरीती समजून घेण्यासाठी नर्मदा परिक्रमा महत्त्वाची असल्याचे मत माजी आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.
रविवारी कडा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.राहुरी साखर कारखान्याचे सेवानिवृत कार्यकारी संचालक
हरिभाऊ मार्कंडे आणि त्यांच्या पत्नी सौ.रामकवर मार्कंडे यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली.

यानिमित्ताने पाद्यपूजा आणि गंगाजल पूजा तसेच मार्कंडे हॉस्पिटलच्या १७ व्या.वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.माजी आ.धोंडे पुढे बोलताना म्हणाले की,प्रत्येक माणसाने आपल्या गावाबाहेरील जग समजून घेण्यासाठी बाहेर जाण्या गरजेचे असते.नर्मदा परिक्रमाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा परिचय होतो. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी बाहेरगवी गेलो तर अडीअडचणीला सामोरे जात शिक्षण घेताना आयुष्यातील अनुभवाची मोठी शिदोरी जमा होते.मार्कंडे परिवाराने आधुनिकतीकडे वाटचाल करताना भारतीय संस्कृतीचे जतन देखील केल्याचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन बोलताना संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल म्हणाले की,मार्कंडे परिवार हा अध्यात्माची साथ घेऊन सामाजिक जीवन उंचावण्याचे काम करत आहेत.हरिभाऊ मार्कंडे आणि त्यांच्या पत्नीने वयाच्या ७० नंतर ही नर्मदा परिक्रमा सहजपणे पार केली ही कौतुकाची बाब आहे.यावेळी वृद्धेश्वर साखर कारखान्याचे सेवानिवृत कार्यकारी संचालक जी.डी.पवार,न्यू आर्ट्स कॉलेज अहिल्यानगरचे सेवानिवृत प्राचार्य भास्करराव झावरे,धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते,डॉ.पूनम मार्कंडे यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,सेवानिवृत प्राचार्य गुलाबराव आबा मार्कडे,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे,भीमराव पाटील,बाबासाहेब गुंजाळ अ.नगर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.डॉ.प्रताप मार्कंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास ह.भ.प.मोहन महाराज आमटे,ह.भ.प. सविताताई महाराज शास्त्री,बाबुशेठ भंडारी,अशोक साळवे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.शिवदास विधाते,राजेश राऊत,अजित ईथापे,मनोज पाचे,मार्कंडे यांचे आप्तेष्ट,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या