Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवी येथे गुरुवारी ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे यांचे

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्था आयोजित महिना शिवरात्री गुरुवार दि.२७ मार्च रोजी ह.भ.प.गायनाचार्य शिवाजी महाराज कोकणे यांचे रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होणार आहे.महाप्रसाद पंगत महादेव परमेश्वर बिरंगळ (आबा) यांची होणार आहे,पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांनी केले आहे.गुरुकुलाचे वार्षिक कार्यक्रम शारदीय नवरात्र महोत्सव सोहळा वारकरी बाल संस्कार भव्य शिबिर संतांच्या पुण्यतिथी,भगवंताची जयंती व महिना शिवरात्री वार्षिक गुरुकुलामध्ये अध्ययन करता विद्यार्थी आहेत.दानशुरांनी
गुरुकुलाच्या विकास व अन्नदानासाठी किंवा वार्षिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य नीळकंठ महाराज तावरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या