Ticker

6/recent/ticker-posts

समतोल व संतुलित समाज रचनेसाठी साहित्यिकांचे मोलाचे योगदान ...... जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे

शिरूर का.(प्रतिनिधी) साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटते;रंजल्या गांजल्या दीनदलित दुबळ्या अनाथ अपंग,शेतकरी शेतमजूर युवा वर्ग आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कर्तव्य साहित्य करते किंबहुना या अनुषंगाने विविध अंगी साहित्यातून मानवी समाज व्यवस्थेला समतोल आणि संतुलित ठेवण्याचे मौल्यवान कार्य घडते! असे अभ्यासपूर्ण विवेचन जेष्ठ पत्रकार तथा दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बीड यांच्यावतीने बुधवारी शिरूर का.येथे बीड ग्रंथोत्सव २०२४ च्या परिसंवाद कार्यक्रमात
'मराठी भाषा उद्योग कला व माध्यमामधील संधी'या विषयावर भाष्य करताना विविध उदाहरणे आणि दाखले देत पत्रकार उत्तम बोडखे यांनी मराठी भाषा आणि माध्यमांमधील संधी अनुषंगाने विस्तृत विवेचन मांडले.ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब मुंडे,पत्रकार व्यंकटेश वैष्णव,सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे,प्रा.डॉ.अशोक घोळवे,प्रा.डाॕ.सोपान सुरवसे,अभिनेता विष्णु केदार आदीसह मान्यवर माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपल्या विचाराच्या माध्यमातून साहित्य आणि माध्यम यामधील सुसंवाद संबंध आणि गरज या अनुषंगाने चर्चा घडवून आणली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा,उद्योग,कला व माध्यमातून संधी या विषयाला धरून आपले विचार मांडले.उत्तम बोडखे म्हणाले की,साहित्यिकांनी आपल्या साहित्यातुन सभोवतालचे प्रश्न मांडण्याची आवश्यकता आहे. मनातील भाव संवेदना व्यक्त करण्यासाठी कथा कविता असतातच;समाजप्रबोधन करण्यासाठी साहित्य हेही महत्त्वाचे साधन आहे. साहित्यिकांनी आपल्या साहित्यातुन सभोवतालचे प्रश्न मांडण्याची आवश्यकताही पत्रकार उत्तम बोडखे यांनी व्यक्त केली.नवोदितांना लिहिण्याची प्रेरणा मिळत आहे.अनुभवावर आधारित कथा, काव्य लेखन समाजावर प्रभाव पाडू शकते,साहित्यिकांना कमीत कमी शब्दात आपले भावविश्व उलगडता आल पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून साहित्यिकांना त्यांच्या मौल्यवान शब्दाचा वृत्तपत्र आणि इतर माध्यम क्षेत्रातून व्यापक प्रसिद्धी देऊन समाजाच्या भल्यासाठी आणि समतोल संतुलित समाज रचना ठेवण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे साहित्य आणि पत्रकारिता एकाच नाण्याच्या दोन बाजू असून समाज रचनेमध्ये या दोन्ही घटकांना सन्मानपूर्वक स्थान देण्याची गरज आहे शासन आणि समाज यांनी साहित्यिक आणि माध्यमिक क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेऊन बुद्धिमान माणसे या क्षेत्रात येतील आणि राहतील याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही वास्तव त्यांनी अधोरेखित केले.परिसंवादाचे अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी तांगडे म्हणाले की,आमच्या कुंटुबात मराठी,हिंदी व इंग्रजी भाषा अवगत आहे. भाषेमुळे आम्हांला आर्थिक सुबत्तता आलेली आहे.मराठीची भाषेची मावशी व मामी हिंदी व इंग्रजी आहे.फक्त भाषेचे महत्व कळुन चालणार नाही.वेळेचेही महत्त्व कळाले पाहिजे.मराठी माणसाने स्वभाव बदलावा लागेल.मी महाराष्ट्र शासनाचा ग्रेड वन चा ट्रेनर आहे.माझ्या गाडीत छोटं ग्रंथालय आहे.वाचन आहे तर ज्ञान आहे हे विसरु नका.भाषेत मोठी ताकत आहे.भाषा पैसे कमवुन देते,उदा.इंदुरीकर महाराज काय करतात? आपणही " बोलभांडवली " माणुस आहे. फक्त बोलण्यवर जीवन जगु शकतो आसे अशोक तांगडे यांनी यावेळी सांगीतले. परिसंवादाचे बहारदार सुत्रसंचलन प्रा.डाॕ.भास्कर बडे यांनी तर ग्रंथालय अधिकारी म्हस्के यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या